Pune News: पुणे पुन्हा 'गँगवॉर'च्या विळख्यात! आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

Pune Gang War: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, पुण्याच्या कोंढवा परिसरात आज (शनिवार, 1 नोव्हेंबर 2025) दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News : या घटनेमुळे संपूर्ण कोंढवा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Gang War: पुण्यात पुन्हा एकदा 'गँगवार' भडकल्याचे संकेत मिळत आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीने आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही खळबळजनक घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा खून म्हणजे थेट 'गँगवॉर'ची सुरुवात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील कोंढवा परिसरात आज (शनिवार, 1 नोव्हेंबर) दुपारी ही थरारक घटना घडली. हत्या खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश काळे असे आहे. गणेश काळे हा गेल्यावर्षी झालेल्या वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती )
 

मृत व्यक्तीची ओळख आणि ‘टोळी' कनेक्शन

गणेश हा आपल्या रिक्षातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या, तसेच कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गणेश काळे याचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड वनराज आंदेकर यांची हत्या गेल्यावर्षी करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाड टोळीने गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत त्यांचा खून केला होता. या आंदेकर खून प्रकरणात वापरलेली पिस्तूले आरोपी समीर काळे याने मध्य प्रदेशातून आणली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.

गणेश काळे याचा खून हा त्याच जुन्या वैमनस्यातून म्हणजेच वनराज आंदेकरच्या खुनाचा थेट बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे या हत्येला 'टोळी युद्धा'ची (Gang War) किनार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी भरती, अर्ज कसा करायचा? वाचा संपूर्ण माहिती )
 

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या गोळीबारानंतर हल्लेखोर अद्याप फरार असून, कोंढवा पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत.
 

Topics mentioned in this article