सुरज कसबे, प्रतिनिधी
सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीमधील एका 25 वर्षीय आयटी अभियंता तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 31 मे च्या पहाटेच्या सुमारास घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या 25 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4.30 च्या सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. यानंतर तिने लिफ्टने 21 व्या मजल्यावरील आपली घरी गेली. यानंतर अवघ्या 12 मिनिटात पहाटे 4.42 च्या सुमारात इमारतीवरुन उडी मारल्याचं निदर्शनास आलं आहे.
नक्की वाचा - Akola News : पोलीस ठाण्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह, पोलीसही चक्रावले; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचं सत्य उघड
अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे. प्राथमिकदृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता एक तिने लिहिलेली सुसाइट नोट सापडली आहे. त्यामध्ये 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', असं लिहिलेलं आढळून आलं आहे. हिंजवडी पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.