'माझ्या मुलाला हिरावून घेतलं, हा अपघात नाही ही हत्याच' अनिशच्या आईचा टाहो

अनिशच्या आईने हा अपघात नसून हा खुन आहे. ही हत्या केली गेली आहे असा आरोप लावला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

पुणे पोर्शे अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यात अनिश अवधिया या तरूणाचा समावेश होता. या प्रकरणी अल्पवयीन तरूणाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर त्याचा बाप बिल्डर विशाल अगरवाल याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दारू पिऊन बेदरकार पणे गाडी चालवून त्या अल्पवयीन मुलाने 19 मे ला दोघांना गाडीखाली चिरडले होते. त्यात अनिश अवधिया याचा जागेवरच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर त्याचा मोठा धक्का अनिशच्या आईला बसला आहे. तिचे रडणे थांबत नाही. त्याने माझा मुलाचा जिव घेतला. माझा मुलाला माझापासून दुर केला असा टाहो ती फोडत आहे.     

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनिश अवधियाच्या आईचे आश्रू थांबायला तयार नाहीत. त्याने माझा मुलाचा जिव घेतलाय. आता मी माझा मुलाला कधीही भेटू शकत नाही अशा त्या त्यांना भेटायला येणाऱ्या कुटुंबीयांना सांगत आहेत. या प्रकरणाचे गांभिर्य पाहील्यानंतर जुवेनाइल कोर्टाने आपला निर्णयात सुधारणा केली आहे. शिवाय त्या अल्पवयीन मुलाची रवानगी पाच दिवसांसाठी बाल सुधारगृहात केली आहे.  

हेही वाचा - अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला?

अनिशच्या आईने हा अपघात नसून हा खुन आहे. ही हत्या केली गेली आहे असा आरोप लावला आहे. यात त्या श्रीमंत बापाच्या बिघडलेल्या मुलाची चुक आहे असेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुलाने ऐवढी मोठी चुक केली नसती तर आज कोणावर जीव गमावण्याची वेळ आली नसती असंही त्या सांगत होत्या. त्याच्या घरच्याने त्याच्यावर बंधन घातली असती तर पुढची दुर्घटना टळली असती. पण तसे झाले नाही. हा अपघात नाही तर ही हत्या आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 

हेही वाचा - पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

या प्रकरणात पोलिसांनीही हलगर्जीपणा केल्याचा आरोप अनिशच्या आईने केला आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे. आरोपी मुलगा मोठ्या बापाचा पोरगा आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण सरकारकडून आम्हाला आशा आहे. त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहीजे. 

Advertisement

हेही वाचा - पबमध्ये 48 हजार उडवले, मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट

पुढे बोलताना अनिश अवधिया यांची आई सविता यांनी सांगितले की माझा मुलगा खुप चांगला होता. सर्वां बरोबर तो मिळून मिसळून राहात होता. घरातल्यांबरोबर त्याचे चांगले संबध होतो. 4 मे ला तो घरी आला होता. शिवाय दुबई वरून त्याने माझासाठी गिफ्टही आणल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्यानंतर त्याने पुन्हा घरी येणार आहे असं सांगून पुण्याला गेला. मात्र तो आता परत कधीच येणार नाही. हे सांगताना सविता यांना आश्रू अनावर झाले.  

हेही वाचा - देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?

अपघाता पुर्वी अल्पवयीन मुलाने पार्टी केली होती. त्याच्याबरोबर त्याचे मित्र ही होते. काही तासात त्याने तब्बल 78 हजार उडवले होते. त्यानंतर त्यांने पोर्शे कारने दोघांना उडवले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. ही कार प्रतितास 200 च्या वेगाने तो पळवत होता. दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. तर त्याचे वडीलांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

Advertisement