पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. कार चालविण्यापूर्वी अल्पवयीन आरोपी पबमध्ये दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यावरुन आणि वेटरच्या जबाबावरुन आरोपीविरोधात 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातापूर्वी आरोपी एक पबमध्ये मित्रांसोबत दारू पित असल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत
अल्पवयीन मुलाने अवघ्या 90 मिनिटांत 48 हजार रुपये खर्च केल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. आरोपीने कोझी पबमध्ये मित्रांसोबत पार्टी करीत होता. यावेळी तो मित्र मैत्रिणींसोबत महागडी दारू पित होता. यावेळी त्याने 48 हजार रुपयांचे बिल भरल्याचं समोर आलं आहे. कोझीने त्यांना सेवा देणं बंद केल्यानंतर 12 वाजून 10 मिनिटांनी ते ब्लॅक मेरियट या पबमध्ये गेले होते.
महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार पोर्शे कारची नोंदणी करण्यात आली नव्हती. नोंदणीसाठी लागणारे 1,758 रुपये न भरल्यामुळे कारची नोंदणी मार्च महिन्यापासून पेंडित होती, असं महाराष्ट्र परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांच्यानुसार, ही कार मार्चमध्ये बंगळुरूच्या एका डिलरने आयात केली होती. नोंदणीसाठी ही कार महाराष्ट्रात पाठवण्यात आली होती. अवघे 1700 रुपये भरून नोंदणी करता आली असती, मात्र ती करण्यात आली नाही. पोर्शे कार आरटीओमध्ये सादर केली असता तिचे नोंदणी शुल्क भरले नसल्याचे समोर आले.
नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी संबंध होते. मुलाच्या आजोबांनी भावासोबतचे वाद मिटविण्यासाठी छोटा राजनची मदत घेतली होती. याशिवाय भावासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनचे जवळचे विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याची भेट घेतली होती. या प्रकरणात अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात सुरेंद्र कुमार अग्रवाल विरोधात पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोप असाही आहे की, या प्रकरणात पोलिसांनी MCOCA लावण्याऐवजी केवळ IPC अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आणि आरोपपत्र दाखल होईपर्यंत अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली नव्हती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world