जाहिरात
Story ProgressBack

अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला?

Pune Porsche crash case : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खास योजना बनवली होती.

Read Time: 3 mins
अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला?
मुंबई:

पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. ती कार चालवणारा तरुण हा अल्पवयीन होता. त्यानं रात्रभर पबमध्ये बसून दारु पिली होती, हे आता उघड झालंय. या प्रकरणात त्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली असून 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालनं अटक टाळण्यासाठी खास योजना बनवली होती. पण, तो पोलिसांच्या तावडीत कसा सापडला याची माहिती आता समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणात FIR दाखल होताच पुण्यातील हा बडा बिल्डर शहराबाहेर गेला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो पहिल्यांदा घरातून कार घेऊन बाहेर पडला. त्यानं ड्रायव्हरला मुंबईच्या दिशेनं कार नेण्यास सांगितलं. त्याचवेळी त्यानं आणखी एका ड्रायव्हरला गोव्याच्या दिशेनं कार नेण्यास सांगितलं.  पुणे-मुंबई मार्गावर त्यानं त्याची कार सोडली आणि मित्राची कार घेऊन तो छत्रपती संभाजीनगला रवाना झाला. 

पोलिसांचा गोंधळ वाढवण्यासाठीच त्यानं वेगवेगळ्या कारचा वापर केला, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रॅक करु  नये यासाठी त्यानं नवं सिम कार्ड वापरण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

( नक्की वाचा : रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड )
 

आरोपी बिल्डर मित्राची कार वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ती कार GPS नं ट्रॅक करण्यास सुरुवात केली. पुणे क्राईम ब्रँचनं त्या मार्गावरील CCTV फुटेज तपासून त्याचा पत्ता लावला. अखेर रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमधील लॉजवर धाड टाकून त्याला अटक करण्यात आली. अग्रवालला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयानं 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पुणे पोलिसांनी विशालला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपला होता. त्यानं आणखी काही पुरावे लपवल्याचा संशय आहे, अन्यथा त्याला लपून बसण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा युक्तीवाद पुणे पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला. विशाल अग्रवालला कोर्टात आणलं त्यावेळी त्याच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. पुणे कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी यावेळी जोरदार निदर्शनं केली. त्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर शाईफेक केली.

( Exclusive : 'त्या' निकालातील मोठी चूक पोलिसांनी पकडली, पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट )
 

अल्पवयीन तरुणाचा जामीन रद्द

दरम्यान, भरधाव वेगानं पोर्शे कार चालवून दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीली बाल हक्क न्यायालयाने दणका दिला आहे. अपघाताच्या घटनेनंतर आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन मिळाला होता. मात्र बाल हक्का न्यायालयाने हा जामीन आता रद्द केला आहे.  अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द झाला असून आता त्याची बालसुधार गृहात रवानगी केली जाणार आहे. आरोपी अज्ञान आहे की सज्ञान हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाणार आहे. बाल हक्क न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला?
Happy Saturday initiative for students likely to be announced after lok sabha election 2024
Next Article
विद्यार्थ्यांचा शनिवार होणार खास! शालेय विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' उपक्रम सुरु होणार?
;