Pune Crime : बॉयफ्रेंडला अडकवायला गेली अन् स्वत:च फसली; कोंडवा फेक रेप प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

खोटी माहिती देणे, खोटा पुरावा तयार करणे तरुणीला महागात पडलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यातील (Pune Crime) एका तरुणीवर डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार (Kondwa fake rape case) केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं होतं. डिलिव्हरी बॉयने तिच्या डोळ्यात स्प्रे केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीकडून करण्यात आला होता. तपासादरम्यान हा सर्व तरुणीचा बनाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशा प्रकारे खोटी माहिती देणे, खोटा पुरावा तयार करणे तरुणीला महागात पडलं आहे. 

कोंढव्यातील या डेटा सायंटिस्ट तरुणीने (वय 22) खोटी बलात्काराची तक्रार दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी तिच्यावर खोटी माहिती व खोटे पुरावे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 3 जुलै रोजी एका ‘डिलिव्हरी बॉय'ने तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा केला होता. मात्र पोलीस तपासात हा प्रकार खोटा असल्याचं उघड झालं आहे.

या गुन्ह्याची नोंद नॉन-कॉग्निझेबल स्वरूपाची असून न्यायालयाची परवानगी घेऊनच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याला काळीमा, सख्ख्या बहिणीचा काटा काढण्यासाठी भावाचं धक्कादायक कृत्य

मोबाइलमध्ये छेडछाड, खोटे पुरावे..

पोलिसांना या तपासात अनेक धक्कादायक बाबी आढळल्या आहे. आरोपी तरुणीने आधी मोबाइलमधील फोटो डिलिट केलं. त्यानंतर खोटे पुरावे तयार करण्यासाठी फोटो क्रॉप केले. पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानुसार तिच्यावर आयपीसीअंतर्गत 212 खोट्या माहितीचे संरक्षण), 217 (खोटी माहिती देऊन अधिकाऱ्याचे कर्तव्य चुकवणे), 228 (खोटे पुरावे बनवणे) व 229 (खोट्या पुराव्याबाबत शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाने 3 जुलै रोजी राज्यभरात मोठी खळबळ उडवली होती. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेची अवस्था यावर व्यापक चर्चा झाली होती. परंतु प्रत्यक्षात बलात्काराची घटना घडलीच नसल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिला तक्रारदारविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article