पुण्याचा 'राजा रघुवंशी'; US मध्ये शिक्षण, 17 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक; सोनम-सिया प्रकरणात साम्य काय आहे?

निळ्या ड्रममध्ये पतीचे तुकडे कोंबणारी मुस्कान रस्तोगी असो...पतीला दरीत ढकलून देणारी सोनम रघुवंशी असो वा नुकतच समोर आलेल्या लोहगड प्रकरणात होणाऱ्या पतीला गडावरुन ढकलून देणारी सिया गोयल असो. या सर्व प्रकरणात महिलांनी प्लान आखून आपल्या पार्टनरची अत्यंत निघृणपणे हत्या केली. 

जाहिरात
Read Time: 4 mins

Sia Goel and Sonam Raghuvanshi : निळ्या ड्रममध्ये पतीचे तुकडे कोंबणारी मुस्कान रस्तोगी असो...पतीला दरीत ढकलून देणारी सोनम रघुवंशी असो वा नुकतच समोर आलेल्या लोहगड प्रकरणात होणाऱ्या पतीला गडावरुन ढकलून देणारी सिया गोयल असो. या सर्व प्रकरणात महिलांनी प्लान आखून आपल्या पार्टनरची अत्यंत निघृणपणे हत्या केली. 

२३ मे, २०२५ आणि १८ जून, २०२६... या केवळ दोन तारखा नाहीत, तर दोन एकसारख्या गुन्ह्यांचे दिवस आहेत. गेल्या वर्षी २३ मे रोजी इंदूरच्या सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीसोबत मेघालयाच्या खोऱ्यांमध्ये जो रक्तरंजित खेळ खेळला होता, अगदी तसाच खेळ पुण्यातील सिया गोयलने २०२६ मध्ये तिचा होणारा नवरा केतन अग्रवालसाठी रचला.

Advertisement

२० वर्षांची सिया गोयलने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या आणि १८ जून रोजी होणारा पती केतन अग्रवालच्या वाढदिवशी त्याची हत्या केली.या केवळ दोन हत्या नाही तर दोन महिलांनी रचलेला हत्येचा प्लान होता. दोघांच्या कुटुंबाकडून या लग्नासाठी दबाव आणण्यात येत होता आणि महिलांना या गोष्टी अमान्य होत्या, त्यातून दोघींना भयंकर हत्येचा प्लान आखला. 

होणाऱ्या पतीला गडावरुन ढकललं...

२६ वर्षीय केतन अग्रवाल याने अमेरिकेतली प्रसिद्ध विद्यापीठातून MBA चं शिक्षण घेतलं होतं. यानंतर तो वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याचे सिया गोयलशी लग्न होणार होतं. यासाठी १७ कोटी खर्च करून पॅलेस बुक करण्यात आलं होतं. याशिवाय दोन खाजगी विमानंही बुक करण्यात आली होती. त्यामुळे कुटुंब लग्नाच्या तयारीत होतं. यादरम्यान १८ जून रोजी केतनचा वाढदिवस होता. केतनच्या कुटुंबाकडून महाबळेश्वरला वाढदिवस साजरा करण्याचा प्लान होता. मात्र सियाला हे अमान्य होतं. तिने होणाऱ्या सासूला व्हिडिओ कॉल करून केतनला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत लोहगडला पाठविण्याची विनंती केली. केतन जेव्हा किल्ल्यावर फोटो काढत होता, तेव्हा त्याला सियाने त्याला गडावरुन ढकलून दिलं. सियाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. सियाने स्वत: पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. 

मात्र पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. घटनेच्या आठवड्याभरानंतर पोलिसांना असे पुरावे सापडले ज्यामुळे सियावरी संशय बळावला. पुणे पोलिसांनुसार, टेक्निकल डिटेल्स, मोबाइल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि अपघातस्थळावरील उपस्थित लोकांच्या चौकशीअंती गोष्टी स्पष्ट झाल्या. पोलिसांनी सांगितलं की, सियाने केतनला दरीत ढकलून दिलं. यानंतर पोलिसांनी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला ताब्यात घेतलं. 

धक्कादायक बाब म्हणजे सियाने आधीच केतनच्या हत्येचा प्लान आखला होता. यासाठी तिचा प्रियकर चेतन चौधरी लोहगडावर आला होता. समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कडक उन्हात हुडी घातलेला दिसत आहे. तो अनेकदा केतन-शियाचा जवळपास आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. चेतनच्या त्या वेशामुळे पोलिसांचा संशय बळावला. आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर केतनच्या हत्येचा खुलासा झाला.

Advertisement

राजा रघुवंशीसारखं प्रकरण...

केतन अग्रवाल हत्या प्रकरण इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखच आहे. राजा रघुवंशी यांची हत्या २३ मे २०२५ रोजी मेघालयात त्यांच्या हनिमूनदरम्यान झाली होती. या हत्येची सूत्रधार राजाची पत्नी, सोनम रघुवंशी होती. सोनमने तिचा प्रियकर, राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाला संपवण्याचा कट रचला. सोनमने स्वतः गुन्हा केला नाही, परंतु तिने तिच्या प्रियकरामार्फत तीन शार्पशूटर भाड्याने घेतले आणि हत्येसाठी तिच्या पतीचे थेट जीपीएस लोकेशन सतत शेअर केले.

संपूर्ण योजना सुनियोजित होती. आरोपीने राजावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्याचा मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला. सुरुवातीला, हे प्रकरण दरोडा आणि बेपत्ता झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पतीची हत्या केल्यानंतर, सोनमने अपहरणाचा बनाव रचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम मेघालयातून इंदूरला आली आणि काही दिवस एका गुप्त घरात राहिली. यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर गेली आणि आपण पीडित आहोत असे दाखवण्यासाठी रडण्याचं नाटक केलं.

Advertisement

मेघालय पोलिसांनी प्रकरणातील प्रत्येक अँगलचा तपास केला. पोलिसांनी सोनमचे कॉल डिटेल्स तपासले. याशिवाय एका लोकल गाइडने सांगितलं की, त्याने सोनमला तीन संशयास्पद लोकांसोबत पाहिलं होतं. फोन कॉल रेकॉर्डवरुन ती प्रियकर राज कुशवाह आणि शूटरच्या संपर्कात होती. पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण प्रकरण समोर आलं. 


मुलीच्या घरातील दबावातून लग्न अन् भयंकर शेवट...

या दोन्ही प्रकरणांमध्ये पाहिलं तर दोघींच्याही घरातून लग्नासाठी दबाव घालण्यात आला होता.