Pune News : 'बंद खोली', बेल्टने मारहाण, एक किडनी निकामी...; पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Pune Youth Killed Over Love Affair: पुण्यात प्रेमसंबंधातून एका 26 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Youth Killed Over Love Affair: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Youth Killed Over Love Affair: पुण्यात प्रेमसंबंधातून एका 26 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 9 आरोपींना अटक केली आहे, ज्यात 2 महिलांचा समावेश आहे. रामेश्वर रवी घेंगट (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

रामेश्वरचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, हे संबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. याच कारणामुळे, 26 जुलै रोजी मुलीच्या वडिलांनी रामेश्वरच्या वडिलांना पिंपळे गुरव येथे बोलावले होते. त्यानंतर रामेश्वरला एका बंद खोलीत नेऊन लाथा, बुक्क्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार, रामेश्वरच्या पोटात, डोक्यात आणि लघवीच्या जागेवर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे.

या मारहाणीत रामेश्वरची एक किडनी निकामी झाली आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रामेश्वरचे वडील रवी घेंगट यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 11 पैकी 9 आरोपींना अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत, तर उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू आहे.

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरली!अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; व्हिडिओ वडिलांना पाठवून केली पैशांची मागणी )

आरोपींची नावे

प्रशांत विनोद खोकर
करण विनोद खोकर
सुरेंद्र हरी सारसर
प्रशांत हरी सारसर
सागर हरी सारसर
अक्षय राजेश सारसर
युवराज सोळंकी

दोन महिला आरोपी

( नक्की वाचा : Titwala : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य )

मृत तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामेश्वर घेंगट याच्यावर यापूर्वी दौंड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता.
 

Topics mentioned in this article