जाहिरात

Kalyan News : शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशांची धाकधूक वाढली, कल्याणमध्ये काय घडलं? 

शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची गंभीर घटना कल्याण येथे घडली. दगड मारणारा व्यक्ती कॅमेरात कैद झाला आहे. आरोपीच्या हातात आणखी दगड असल्याने प्रवासी भयभीत झाले होते.

Kalyan News : शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशांची धाकधूक वाढली, कल्याणमध्ये काय घडलं? 
Shirdi Vande Bharat Express Stone Accident News
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Shirdi Vande Bharat Express Today News : शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची गंभीर घटना कल्याण येथे घडली. दगड मारणारा व्यक्ती कॅमेरात कैद झाला आहे. आरोपीच्या हातात आणखी दगड असल्याने प्रवासी भयभीत झाले होते.या घटनेमुळं प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आरोपीच्या काही तासांतच मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आलं आहे.सनी कांबळे (23) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.तो पुण्यातील रहिवासी असून त्याने दगडफेक केल्याची कबुली पोलीस तपासादरम्यान दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरपीएफ (RPF) कल्याण आणि सीआयबी (CIB) कल्याण यांनी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला काही तासांतच ताब्यात घेतलं. 13 मार्च रोजी गाडी क्रमांक 22223 CSMT–साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस (डाउन) ही गाडी ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान धावस असताना अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. एक्स्प्रेसच्या C-1, C-3, C-4 आणि C-7 या डब्यांवर दगडफेक करण्यात आली,ज्यामुळे त्या डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

नक्की वाचा >> Pune News : रांजणगाव गणपती मंदिरासमोर सर्वात भयानक घटना! पुणे-अहिल्यानगरच्या प्रवाशांची पळापळ

गांजा सेवन केल्यामुळे दगडफेक केल्याची आरोपीची कबुली

या घटनेची माहिती डीएससीआर(DSCR) आणि एस्कॉर्ट पथकाला मिळताच कल्याण आरपीएफ आणि सीआयबी टीम यांनी संयुक्तपणे कल्याण येथील पत्रीपूल परिसरात शोधमोहीम राबवून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपी सनीने सांगितलं की, त्याने गांजा सेवन केल्यामुळे नशेच्या अवस्थेत रेल्वे रुळाजवळ येऊन काही दगड उचलले आणि प्रवाशांना घाबरवण्याच्या उद्देशाने वंदे भारत गाडीच्या वेगवेगळ्या डब्यांवर फेकले.दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला एमसीआर (MCR) कस्टडी देण्यात आली आणि आधारवाडी कारागृहात आरोपीची रवानगी केली.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' भागात सुरु होता गॅसचा काळाबाजार, पुरवठा विभागाने गोडाऊनवर धाड टाकली अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com