Pune News: पुण्यात खळबळ! महापौर कार्यालय तातडीने रिकामं केलं, पोलीस यंत्रणा अलर्ट, नेमकं काय घडलं?

'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने हा ईमेल आला असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पुणे महापालिकेत तातडीने खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Mayor Office Bomb Threat:  पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील महापौर कार्यालयात हा मेल आला ज्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून महापौर कार्यालय रिकामे करण्यात आले आहे. 

VIDEO: ठाण्यात परप्रांतियाची मुजोरी! वृद्ध व्यक्तीला निर्दयीपणे मारलं, नंतर शिवसैनिकांनी घडवली अद्दल

पुण्यातील महापौर कार्यालय उडवण्याची धमकी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला आणि नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला आज ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने हा ईमेल आला असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पुणे महापालिकेत तातडीने खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.

Advertisement

पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आलेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच RSS मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.  ई-मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे.

​सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही जोखीम न पत्करता, महापालिकेच्या इमारतीतील अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस दलाचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथक तातडीने महापालिका आवारात दाखल झाले असून, इमारतीची कसून तपासणी केली जात आहे.

पुणे महानगरपालिकेकडून इमेल संदर्भात स्पष्टीकरण 

पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय व माननीय महापौर कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट बाबतचा ई मेल थेट प्राप्त झालेला आहे. यांच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम सर यांच्या सूचने नुसार संपुर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली असून पुणे पोलीस बॉम्ब शोधक पथकाकडुन शोधकार्य चालु आहे, शोधकार्य पूर्ण झाले नंतरच मुख्य इमारत कामकाज चालु होईल , तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात प्रवेश निषिद्ध करण्यात येत आहे. सदरची बाब माहिती साठी कळविण्यात येत आहे.

Advertisement

Beed News: अरेरे! जावयासाठी अंगठी लपवलेला “धोंडा” मांजराने खाल्ला; पुढं जे घडलं.. जीव गेला, ऑपरेशन केलं अन्...

Topics mentioned in this article