जाहिरात

VIDEO: ठाण्यात परप्रांतियाची मुजोरी! वृद्ध व्यक्तीला निर्दयीपणे मारलं, नंतर शिवसैनिकांनी घडवली अद्दल

या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, ज्यानंतर शिवसैनिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. 

VIDEO: ठाण्यात परप्रांतियाची मुजोरी! वृद्ध व्यक्तीला निर्दयीपणे मारलं, नंतर शिवसैनिकांनी घडवली अद्दल

रिझवान शेख, ठाणे:

 Thane Viral Video:  मुंबईमध्ये परप्रांतियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परप्रांतियांकडून मराठी बांधवांवर अरेरावी, मारहाणीचे प्रकार घडत आहेत.  ठाण्यामधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाण्यामध्ये एका मुजोर परप्रांतियाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, ज्यानंतर शिवसैनिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. 

PCMC News: हौसेला मोल नाही! लेक आणि सुनेलाही धोंडे दान; बारणे कुटुंबियाचं गिफ्ट पाहून सगळेच शॉक

ठाण्यात परप्रांतियाची दादागिरी, वृद्धाला मारहाण 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रस्त्यात पाणी पिऊन थुंकू नको असं सांगितल्याचा राग मनात धरुन एका परप्रांतीय ओला चालकाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या एका मॉलबाहेर हा धक्कादायक प्रकार  घडला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये हा परप्रांतीय तरुण वृद्ध व्यक्तीला भररस्त्यात बेदम मारताना दिसत आहे. दरम्यान,  या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही शिवसेनेच्या युवासैनिकांनी त्या परप्रांतियाला शोधून काढले. मारहाण केल्याच्या काही तासानंतरच दोन्ही शिवसेनेच्या युवासैनिकांनी त्या ओला चालकाचा शोध घेत बेदम चोप दिला त्यानंतर त्याला वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Beed News: अरेरे! जावयासाठी अंगठी लपवलेला “धोंडा” मांजराने खाल्ला; पुढं जे घडलं.. जीव गेला, ऑपरेशन केलं अन्...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com