Pune News : वडिलांनी रात्री मोबाईल तपासताच नको ते घडलं, महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.  वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune School Girl Ends Life
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Crime News Today :  पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.  वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली. चिखली परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार,मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होती. 17 मार्च रोजी 
रात्री नऊच्या सुमारास वडिलांनी तिचा मोबाईल तपासला होता. याचा राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते.

Advertisement

नक्की वाचा >> महिलांकडून महिलांसोबत घाणेरडे चाळे, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरू आहे भयानक प्रकार; Instagram वर खळबळजनक व्हिडीओ

मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.मात्र, विवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून  अधोरेखित झाले आहे.

नक्की वाचा >> Kalyan News : हायप्रोफाईल सोसायटीतील रहिवासी संतापले, महापालिकेमुळे 'त्या' 112 कुटुंबावर वणवण भटकण्याची वेळ