जाहिरात

महिलांकडून महिलांसोबत घाणेरडे चाळे, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरू आहे भयानक प्रकार; Instagram वर खळबळजनक व्हिडीओ

एका तरुणीला मुंबईच्या ट्रेनमध्ये विचित्र अनुभव आला. ट्रेनमध्ये समलिंगी मुली प्रवास करत असल्याचा दावा या तरुणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

महिलांकडून महिलांसोबत घाणेरडे चाळे, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरू आहे भयानक प्रकार; Instagram वर खळबळजनक व्हिडीओ
Mumbai Local Train Viral Video
मुंबई:

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेन लाखो प्रवाशांची लाईफलाईन आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी ऑफिसला वेळेवर पोहोचून नोकरीचं कर्तव्य बजावणं किती महत्त्वाचं असतं, हे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माहितच आहे. परंतु,दिवसेंदिवस ट्रेनमधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.अशातच एका तरुणीला मुंबईच्या ट्रेनमध्ये विचित्र अनुभव आला. ट्रेनमध्ये समलिंगी मुली प्रवास करत असल्याचा दावा या तरुणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

तरणीने व्हिडीओ शेअर करत काय म्हटलं?

@Nikita_Chavan1410 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत तरुणीनं म्हटलंय की, "मला असं वाटतं की, मुंबईल लोकल सगळ्या मुलींना लेस्बियन करण्यामध्ये सफल होणार आहे.माझ्यासोबत आज असं झालं, जो प्रॉपर सहा साडेसहा वाजताचा टायमिंग असतो, त्या टायमिंगला मी ट्रेनमध्ये चढली.ट्रेनमध्ये गर्दी होती. जिथे टेकून उभे राहतात. एक स्टेशन आलं.तिचं अंग माझ्या अंगाला लागत होतं. ती माझ्यापेक्षा उंचीने लहान होती.दोघीही एकमेकांना चिपकलो, स्पर्श होऊ लागला.तिचे केस माझ्या सर्व चेहऱ्यावर उडत होते.

नक्की वाचा >> Kalyan News : आधी घरांवर सुतळी बॉम्ब फेकले, आता कल्याणच्या नागरिकांसमोर नवं संकट, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ

इथे पाहा इन्स्टाग्रामचा व्हायरल व्हिडीओ

 मी केस सावरण्याचा प्रयत्न करत होते. ती छोटी होती माझ्यापेक्षा.. मी तिच्याकडे खाली पाहिलं, तेव्हा ती फिल्मी स्टाईलने माझ्याकडे वर पाहत होती. मला विचारलं, कुठे उतरणार? मला हसायलाच आलं. जर कोणी बॅकग्राऊंड म्युझिक लावलं असतं तर खरंच तो सीन झाला असता.इतक्या जवळ होतो की, मागून कोणी धक्का दिला असता, तर तिच्या फोरहेडला माझं किस झालं असतं. मुंबई रेल्वेचं धन्यवाद..या अनुभवासाठी"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com