लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. आता तर पुण्यातील उच्चभ्रू भागात बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. हा नराधम बाप गेले आठ महिने आपल्या 14 वर्षांच्या लेकीवर लैंगिक अत्याचार करीत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. पुण्यातील नांदेड सिटी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नावर सवाल उपस्थित केले जात होते. आता तर कुटुंबातील व्यक्तीने, सख्ख्या बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा - Shocking Video : थोपाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ
बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 45 वर्षीय नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणलाय त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.