Pune Navale Bridge Accident : मराठीतील हरहुन्नरी अभिनेता दगावला; वडिलांसाठी नवस करणाऱ्या स्वातीचाही मृत्यू

मराठीतील हरहुन्नरी नाट्य अभिनेता धनंजय कोळी याचा नवले पूल अपघातात मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावरील झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक जणांचा जागीच मृ्त्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. 

नवले पूल अपघातात मराठी अभिनेत्याचे निधन....

मराठी नाट्य अभिनेता धनंजय कोळी (Dhananjay Koli Death) हा नवले पूल अपघातात मृत्युमुखी पडला. अपघातात मुत झालेल्यांपैकी तो एक होता. धनंजय कोळी हा मूळचा जयसिंगपुरचा. नाटकाची आवड असल्याने तो पुण्यात राहत होता. इथेच तो त्याचा व्यवसाय देखील सांभाळत होता. पत्नी, आई, वडील असे त्याचे कुटुंब आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला मुलगा झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. त्यातच नवले पुलावर अपघात घडला आणि त्यामध्ये हरहुन्नरी कलाकार धनंजय कोळी याचा मृत्यू झाला. या घटनेने कोळी कुटुंबात शोककळा पसरली आहे. मुलाच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर कुटुंबीयांनी पुण्याकडे धाव घेतली. 

नक्की वाचा - Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?

नवसाचा शेवटचा गुरुवार ठरला आयुष्याचा शेवटचा

स्वाती संतोष नवलकर (३७) या आपल्या लहान मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या. वडिलांना तीन वर्षांपासून गंभीर आजार झाला  होता. त्यातून बरे व्हावेत म्हणून पाच गुरुवारांचा नवस त्यांनी केला होता. दुर्दैवाने, नवसाचा हा शेवटचा गुरुवारच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा गुरुवार ठरला. दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या नवलकर कुटुंबावर घरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर काळाने घाला घातला. मुंबई–बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जबर धडक दिली.त्यात त्याचा मृत्य झालाय. यामध्ये त्यांच्या जवळचे मिळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.