तो ही 'नकोसा', रात्रीच्या अंधारात नवजात बाळाचा रडण्याचा आवाज अन्...; पुण्यातील भीतीदायक वास्तव

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओखळ असलेल्या पुण्यातून नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओखळ असलेल्या पुण्यातून नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. पुण्यात एक नवजात बाळाला जन्म देऊन रस्त्यावर सोडून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वडगा बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमध्ये घडली. घृणास्पद बाब म्हणजे रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नवजात बालकाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती.

नक्की वाचा - पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

काल 9 डिसेंबरच्या रात्री बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांशी संपर्क केला.  सिंहगड पोलिसांन नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या बालकाची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव परिसरातल्या रेणुकानगरीमध्ये नवजात बालकाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात केल दाखल केली आहे. सध्या बालकाची तब्येत स्थिर असून अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून नवजात बालकाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे.