जाहिरात

Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये 26 वर्षीय पोलिसाचा आढळला मृतदेह, 2 वर्षापूर्वीच पोलीस भरती, धक्कादायक कारण समोर

Pune News: हॉटेलमध्ये रुम घेऊन पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने पुण्यात खळबळ उडालीय.

Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये 26 वर्षीय पोलिसाचा आढळला मृतदेह, 2 वर्षापूर्वीच पोलीस भरती, धक्कादायक कारण समोर
"Police Sub Inspector Suicide Case At Pune: हॉटेलमध्ये पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ"
Canva
  • पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली.
  • हॉटेलमध्ये रूम घेतली आणि विष पिऊन आत्महत्या केली.
  • आत्महत्या करण्याचे धक्कादायक कारण समोर
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Pune News: पुण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडालीय. बुधवारी (7 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सूरज मराठे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते 26 वर्षांचे होते. सूरज मराठे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 

टोकाचे पाऊल का उचलले?  

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज मराठे गुडघ्यांच्या आजारामुळे त्रस्त होते, याच कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे; तशी माहिती त्यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केलीय. 

दोन वर्षांपूर्वीच पोलीस दलात भरती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज मराठे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. एक वर्ष ट्रेनिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची वर्षभरापूर्वीच तासगाव पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली. ते अविवाहित होते. सूरज मराठे यांनी मंगळवारी (6 जानेवारी 2026) डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये रूम घेतली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आल्याने दरवाजा ठोठावण्यात आला, पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं हॉटेल चालकाने डेक्कन पोलिसांनी त्वरित संपर्क साधला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार

(नक्की वाचा: Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार)

आजारपणाला कंटाळले होते सूरज मराठे

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज मराठे यांनी आठ दिवसांपूर्वी आजारपणासाठी रजा काढली होती. दरम्यान या प्रकरणी  डेक्कन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. एका पोलिसाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडालीय.

Palghar News: पालघरमध्ये खळबळ! 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही अन्...

(नक्की वाचा: Palghar News: पालघरमध्ये खळबळ! 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही अन्...)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com