Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. एका विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या फुड मॉलमध्ये असलेल्या पूनम स्नॅक्स सेंटर या स्टॉलवर देण्यात आलेल्या फळांच्या प्लेटमध्ये विषारी कीटक आढळल्याचे गंभीर प्रकरण समोर आलंय. यामुळे विद्यापीठ परिसरातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या (6 जानेवारी) दिवशी हा प्रकार घडलाय.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याने पूनम स्नॅक्सच्या स्टॉलवरून फ्रुट प्लेट घेतली, त्यामध्ये संबंधित व्यक्तीला विषारी कीटक सापडला. या घटनेबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तसेच फुड मॉलमधील निकृष्ट आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य वारंवार धोक्यात येत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय.
विद्यार्थ्यांची मागणी
अशा अस्वच्छ परिस्थितीमुळे आरोग्यास घातक जंतू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ज्यामुळे अतिसार, उलटी होणे, ताप, अन्नाद्वारे होणारी विषबाधा यासारखे आजार होण्याची भीतीही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. तसेच आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी,अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.
(नक्की वाचा: Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये 26 वर्षीय पोलिसाचा आढळला मृतदेह, 2 वर्षापूर्वीच पोलीस दलात भरती, धक्कादायक कारण समोर)
दरम्यान याच स्टॉलबाबत यापूर्वीही निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांसंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटलंय. पण विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. समस्या केवळ फ्रुट प्लेटपुरती मर्यादित नसून संबंधित स्टॉलवरील सर्व खाद्यपदार्थांची सखोल गुणवत्ता तपासणी करून तातडीने कारवाई करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केलीय.
(नक्की वाचा: Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार)
विद्यार्थ्यांनी दिला थेट इशाराया घटनेनंतर विद्यापीठाच्या कॅन्टीन समितीतील एका सदस्याने स्टॉलची पाहणी केल्याचेही सांगण्यात आले. पण कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान संबंधित स्टॉलविरोधात लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

