जाहिरात

Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार

Pune News: पुण्यामध्ये 17 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आलीय, यामुळे शहरात खळबळ उडालीय.

Pune News: 17 वर्षांच्या मुलाच्या हत्येनं पुण्यात खळबळ; आधी मुलीच्या मदतीने अपहरण, मग दगड-कोयत्याने केले वार
Pune News: पुणे हादरले! 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या
प्रतिकात्मक फोटो (Canva)
  • पुण्यात 17 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या
  • जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर
  • हत्येप्रकरणी दोन 19 वर्षीय तरुणांना अटक
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Pune News: पुणे शहर पुन्हा हादरलंय. 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामद्वारे आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून मुलाला कात्रज येथे बोलावले. 

नेमके काय घडलं? 

अमनसिंग गच्चड असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी प्रथमेश आढळ (वय वर्षे 19) आणि नागेश धबाले (वय वर्षे 19) अशा दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. आरोपींनी मुलीच्या मदतीने अमनसिंगला कात्रज येथे बोलावले. यानंतर खेड शिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने वार करून अमनसिंगची हत्या केली. आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीय. 

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार)

हत्या का करण्यात आली?

29 डिसेंबर 2025 रोजी अमनसिंग गाडी घेऊन घरातून गेला तो परत आलाचा नाही, यामुळे घाबरलेल्या आईने 31 डिसेंबर 2025 रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार पोलिसांनी अमनसिंगच्या मोबाइलचे सीडीआर आणि लोकेशनवरून तपास करण्यास सुरुवात केली. तपास करताना पोलिसांसमोर अपहरण आणि हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले. 

(नक्की वाचा: Pimpri Chinchwad News: शांत बस म्हटल्याचा राग, दारूड्या मित्राच्या भावाने डोक्यात घातला दगड; तरुण जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून आरोपींनी अमनसिंगचे अपहरण करून हत्या केली. दरम्यान तरुणांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे पुणे शहरात स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झालीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com