पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसर करण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं सांगितलं आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण देशात दोन दिवसापासून अस्वस्थता आहे. मोदींनी एक आवाहन केलं. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जे मोदींनी सांगितली त्याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे असं शरद पवार म्हणाले. मोदींचं वक्तव्य आल्यानंतर मी त्यांना एक विनंती केली आहे. प्रश्न गंभीर आहे? किती गंभीर आहे? अशा वेळी देशाच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली पाहीजे. त्या बैठकीला सर्व मंत्र्यांनी स्वत: हजर राहावा. अशा बैठका या आधी ही झाल्या आहे. पण त्यातील एका ही बैठकीला मोदी उपस्थित नव्हते. पण सध्या किती गंभीर प्रश्न आहे हे स्वत: मोदी यांनी या बैठकीत उपस्थित राहून सांगावं असं म्हणत शरद पवारांनी गुगली टाकली आहे.
यावेळी त्यांनी मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर कुणी काय काय करतय यावरून फिरकी घेतली. ते म्हणाले मी सकाळ पासून बघतोय, कुणी मोटरसायकलवरून जातोय, कुणी चालत जातोय, एकाने तर जाहीर केलं, मी मंत्री आहे, पण माझ्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. आधी 17 गाड्या होत्या. त्या आता 8 असणार आहेत. म्हणजे पूर्वी 17 गाड्या कशासाठी होत्या हे मला काही समजलं नाही असं म्हणत त्यांनी शिंदेंना चिमटा काढवा. पुढे ते म्हणाले देशात अशी स्थिती पहिल्यांदाच झाली नाही. अर्थ व्यवस्थेबाबत गंभीर स्थिती आहे. त्यामुळे ती सावरण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे असं ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ही केली. सहकार्याचं बोलत असताना मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी आपली भाषा चांगली वापरावी.
जर भाषा चांगली नसेल तर त्याचा लोकांवर परिणाम होवू शकतो. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटमेंट पाहीले. त्यात त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत जे शब्द वापरले मला स्वत: ला ते अयोग्य वाटले. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. ते ही संसदेतले. विरोधी पक्षनेता ही संवैधानिक पद आहे. ते पद लोकसभेचे आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतची भाषा चांगली नाही असं ही त्यांनी फडणवीसांना सुनावलं. दरम्यान रुपया सतत घसरत चालला आहे. तो खाली का येतो त्याचा ही विचार केला पाहीजे. इराणचा जो विषय आहे त्याचा काही ना काही परिणाम आहे. पण तेवढाच आहे का? मग तेवढाच असेल तर हा निर्णय यायला ऐवढा उशिर का झाला असा प्रश्न त्यांनी मोदींना केला आहे. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागून गेले, त्यानंतर हे सर्व निर्णय घेतले. निवडणूक प्रक्रिया सुरू होती, त्यावेळी हे गांभिर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नव्हतं का? असा प्रश्न ही त्यांनी केला. या निवडणुकीत त्यांनी जनतेत जागृती करावी हा विचार आला नाही का अशी ही विचारणा केली.
एकीकडे जनतेला आवाहन केलं जात आहे. तर दुसरीकडे सोमनाथाच्या मंदिराला 75 वर्षे झाली, त्या कार्यक्रमाला पंतप्रधान गेले होते. ते त्या कार्यक्रमाला जाणे चुकीचे नाही. पण त्या कार्यक्रमात सहा विमानांचा एक कार्यक्रम करण्यात आला. तो गरजेचा होता का? मोदींनी आवाहन केल्यानंतर हे सर्व होतं. प्रश्न परिस्थिती गंभीर आहे. हे गांभिर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहीजे असा टोला ही लगावायला ते विसरले नाहीत. काटकसर करण्याचा सल्ला म्हणजे रूपयाचे मुल्य अजून खाली घसरू द्यायचे नाही असा आहे. ते काही चुकीचं नाही. पण खर्च कमी करण्यासाठी इतर ही अनेक गोष्टी आहे. त्यात विशेषत: प्रशासनात खर्च कमी करता येवू शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करावे हे योग्य नाही असं ही ते म्हणाले. फडणवीस आज मोटरसायकलवरून मंत्रालयात आले. पण ते उद्या ही तसचं करणार आहेत का त्यांनी तसं केलं तर लोक गांभिर्याने घेतली. की हे फक्त प्रतिकात्मक आहे अशी विचारणा ही त्यांनी यावेळी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world