Pune News : डॉक्टरांच्या गाडीने महिलेला अक्षरश: चिरडलं; बिबवेवाडीतील थरकाप उडवणारं CCTV फुटेज आलं समोर

पुण्यातील बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमधील सद्गुरू आंगण सोसायटीच्या आवारात अंगावर शहारे आणणारा अपघात घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य पाटील, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातील बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमधील सद्गुरू आंगण सोसायटीच्या आवारात अंगावर शहारे आणणारा अपघात घडला आहे. एका दवाखान्यातील डॉक्टरच्या गाडीने एका महिलेला अक्षरश: चिरडलं. ही गाडी डॉक्टरचा सहकारी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात जवळच राहणारी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. 

भयंकर अपघाताचा व्हिडिओ...

स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला येथील गिरणीमध्ये दळण टाकण्यासाठी आली होती. दळण टाकून परत निघालेली असताना या गाडीची त्या महिलेला धडक बसली. चालकाने सुरुवातीला पार्किंगमधून गाडी मागे घेतलेली होती. त्यानंतर, त्याने ही गाडी पुन्हा पुढे घेतली. थोडा वेळ थांबून पुन्हा गाडी पुढे घेत असतानाच संबंधित महिला तेथून चालत निघालेली होती. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने या महिलेला धडक दिली. त्यानंतर ही महिला खाली पडली. अनियंत्रित असलेली ही गाडी तशीच तिच्या अंगावरून पुढे गेली.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : डेक्कन रोडवरील हॉटेलात पुण्याचा प्रसिद्ध उद्योजक मृतावस्थेत; खोलीतील दृश्य पाहून पोलिसही हादरले!

हा अपघात घडताच क्षणार्धात आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले. गाडीला बाजूला करून गाडीखाली अडकलेल्या महिलेला बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आलं. या महिलेला गंभीर मार लागला असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांना माहिती कळवण्यात आलेली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

Topics mentioned in this article