जाहिरात

Pune crime news: पत्नीवर संशय, लेकरावर राग, इंजिनिअर पतीचं थरकाप उडवणारं कृत्य

या सर्व गोष्टींना कटाळून पत्नी स्वरूपाही दोन्ही मुलांना घेवून विशाखापट्टणम इथे निघून गेली होती. पण मोठ्या मुलाची परिक्षा असल्याने ती पुण्यात आली होती.

Pune crime news: पत्नीवर संशय, लेकरावर राग, इंजिनिअर पतीचं थरकाप उडवणारं कृत्य
पुणे:

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका उच्च शिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. हा तरुण आय टी इंजिनिअर आहे. तो पुण्याच्या चंदननगर परिसरात राहातो. पत्नीवर संशय घेत होता. शिवाय त्याचा लहान मुलगा आपला नसल्याचाही त्याचा आरोप होता. त्यावरून पती पत्नीत नेहमी भांडणं होत होती. त्यातून या माथेफिरून बापाने चक्क आपल्या साडे तीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेने सर्वच जण हादरले आहेत. हत्या केल्यानंतर तो दारूच्या नशेत पडला होता.शिवाय मुलाला मारून कुठे टाकले ही ही त्याला आठवत नव्हते. पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माधव टीकेटी हा पेशाने इंजिनिअर आहे.  तो आणि त्याची पत्नी दोघे ही मुळचे विशाखापट्टणमचे रहिवाशी आहेत. माधव हा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा हा आठ वर्षाचा आहे. तर छोटा मुलगा हा साडे तीन वर्षाचा आहे. हिम्मत टीकेटी असं त्याचं नाव आहे. मात्र हा मुलगा आपला नाही, असं माधव नेहमी पत्नीला सांगत. त्यावरून त्यांच्यात वाद ही होत होते. माधव दारूच्या आहारी ही गेला होता. त्यामुळे त्याला नोकरीही गमवावी लागली होती. त्यातून तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

ट्रेंडिंग बातमी - Narayan Rane: नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे 2 फोन, चर्चा काय झाली? राणेंनी सविस्तर सांगितलं

या सर्व गोष्टींना कटाळून पत्नी स्वरूपाही दोन्ही मुलांना घेवून विशाखापट्टणम इथे निघून गेली होती. पण मोठ्या मुलाची परिक्षा असल्याने ती पुण्यात आली होती. पुण्यात आल्यानंतर ती पतीकडेच राहात होती. त्यावेळी पती पत्नी पुन्हा जोरदार भांडणं झाली. त्यावेळी झोपलेला साडे तीन वर्षाचा मुलगा हिम्मत त्यांच्या आवाजाने उठला. त्यानंतर पती घरातून बाहेर जायला निघाला. त्यावेळी चिमुकला हिम्मत त्याच्या मागे लागला. त्याला घेवून तो दुचाकी वरून निघाला. पुढे एका दारुच्या दुकानात जावून त्याने दारू ही घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?

दारू पिऊन झाल्यानंतर त्याने एका दुकानातून चाकू विकत घेतला. नंतर तो चंदननगरच्या जंगला मुलाला घेवून गेला. तिथेच त्याने त्या चिमुकल्याचा गळा चाकूने चिरला. शिवाय त्याचा मृतदेह तिथेच टाकून तो एका लॉजमध्ये गेला. तिथेच दारूच्या नशेत तो झोपला. मुलगा आणि पती घरी आला नाही म्हणून पत्नी स्वरुपा यांनी चंगननगर पोलिस स्थानक गाठले. त्यांनी पती आणि मुलगा हरवले असल्याची तक्रार दिली. त्यावेळी अपहरणाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना शोध घेतला. 

ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर काढून चालणार नाही' मोदींच्याच मंत्र्याने थेट भूमिका घेतली

त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यावरून मुलगा हा त्याच्या वडीलांबरोबरच होता हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या मोबाईल लोकेशन वरून तो ज्या लॉजवर झोपला होता, तिथे पोलिस पोहोचले. त्यावेळी तो नशेत होता. मुलगा कुठे आहे हे तो सांगत नव्हता. मात्र त्यानंतर चौकशीत त्याने मुलाचा आपण खून केल्याचे मान्य केले. शिवाय जिथे मृतदेह टाकला होता ती जागा ही दाखवली. गळा चिरलेल्या अवस्थेत त्या चिमुल्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यत घेतला आहे. या प्रकरणानंतर सर्वच जण हादरले आहे.