जाहिरात

Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर काढून चालणार नाही' मोदींच्याच मंत्र्याने थेट भूमिका घेतली

औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडलं आहे. हा इतिहास आहे. त्याचे स्मरण सर्वांना असावं. तो क्रुर होता, असं केंद्रीय मंत्री म्हणाले.

Aurangzeb Tomb: 'औरंगजेबाची कबर काढून चालणार नाही' मोदींच्याच मंत्र्याने थेट भूमिका घेतली
शिर्डी:

औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी सध्या राज्यातलं वातावरण चांगलेच तापले आहे. विश्व हिंदू परिषदेने राज्यभर त्यासाठी आंदोलनं केली. पण ही कबर उखडून टाकणे तेवढे सहज शक्य नाहीत. त्यात आता मोदी सरकारमधल्या एक मंत्र्यानेच औरंगजेबाजी कबर काढून टाकण्याला विरोध केला आहे. शिवाय तसं करणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र अशांत राहून चालणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडलं आहे. हा इतिहास आहे. त्याचे स्मरण सर्वांना असावं. तो क्रुर होता. त्याल इथल्या मातीतच गाडलं गेलं. त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. त्यामुळे त्याची कबर उखडून टाकावी अशी मागणी अनेक वर्षांनी होत आहे. पण औरंगजेबाला विरोध करा. ही कबर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या सर्व गोष्टी पाहाता त्याची कबर खोदून चालणार नाही अशी स्पष्ट भूमीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. ही आपली आणि आपल्या पक्षाची मागणी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

ट्रेंडिंग बातमी - CM Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार : देवेंद्र फडणवीस

औरंगाबादचं नाव शिंदे, फडणवीस, पवार सरकारने बदललं. त्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे. त्यामुळे कबरीचा मुद्दा तेवढा महत्वाचा नाही. कबर न काढता छ. संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावं अशी आपली सुचना असेल असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र अशांत राहून चालणार नाही. राज्यात शांतता नांदली पाहीजे. ज्या दंगली झाल्या त्या चुकीच्या होत्या असंही ते या निमित्ताने म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला

मुस्लमांना यावेळी आठवले यांनी एक सल्ला ही दिला. औरंगजेबा बरोबर इथल्या मुस्लीमांनी नातं जोडू नये. तो तुमच्या औलादीचा नव्हता. तो मोघलांची औलाद होती. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेरीस आणले होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम होते. शिवाय ते चांगल्या पदावर होते. मुस्लीम मावळे छत्रपतीं बरोबर होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे औरंगजेबा बरोबर इथल्या मुस्लीमांनी नातं जोडू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं.