लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सुंदर योग असतो. अनेकांची लग्न होत नाहीत. त्याला कारण ही वेगवेगळी असतात. अशा लग्नाळूंचा गैरफायदा त्यातून घेतला जातो. लग्न करण्यासाठी ते ही मग मागेपुढे पाहात नाहीत. त्यातूनच मग फसवणूक होते अन् पश्चाताप करण्याची वेळ येते. पण पुण्यात त्या पेक्षा ही धक्कादायक आणि भयंकर प्रकार समोर आला आहे. इथं लग्न लावण्याच्या नावाने सिंधुताई सकपाळ यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचं दिसून येत आहे. ऐवढचं नाही तर लग्न करू इच्छीणाऱ्यांकडून ऑनलाईन पैसेही उकळले जात आहेत. सिंधुताईंच्या कन्या ममता यांना याची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक जाहीरात सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ही जाहीरात लग्ना संदर्भात आहेत. यात सिंधुताई सकपाळ यांचे नाव वापरण्यात आलं आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत. जे लग्न करण्यास इच्छुक आहेत त्यांनी संपर्क करावा असं त्यात म्हणलं आहे. संपर्क क्रमांक ही या जाहीरातीत दिसून येत आहे. 21 ते 40 वयोगटातील मुली लग्नासाठी आश्रमात आहेत. चांगला नोकरी करणारा मुलगा हवा. लग्न आश्रमाच्या नियमा नुसार केलं जाईल. आश्रमात कुणालाही थेट प्रवेश दिला जाणार नाही. त्या आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी 15 ते 20 हजार खर्च येईल असं ही लिहीलं आहे.
त्यानंतर अनेक इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते. त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15000 रुपये फोन पे ने किंवा google पेने मागवले जातात. मात्र प्रत्यक्षात लग्न सोडा, दिलेले पैसे ही त्यांना परत मिळत नाहीत. त्यातून अनेक तरुणांची फसवणूक झाली आहे. हा सगळा प्रकार काही जणांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवला.
त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे. तुमच्याकडे मुलगी आहे का? अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली. त्यावेळी देखील समोरून पंधरा हजार रुपयाची मागणी करण्यात आली. शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले.. यासंदर्भात आता सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी सासवड येथील पोलिसात पत्र दिलं आहे. शिवाय पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये ही त्या तक्रार देणार आहेत. हे असे प्रकार माईंच्या नावाने चालवू नये आणि माईंची बदनामी खपवून घेतली जाणार नाही , अस मत ममता सपकाळ यांनी व्यक्त केल आहे.