जाहिरात

Pune News : पाण्यात उगवलेला गांजा, पुण्यातील विमानतळावर बँकॉकहून तस्करी केलेला गांजा नेमका काय आहे?

बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून पुणे विमानतळावर गांजा जप्त करण्यात आला आहे.

Pune News : पाण्यात उगवलेला गांजा, पुण्यातील विमानतळावर बँकॉकहून तस्करी केलेला गांजा नेमका काय आहे?

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News : पुणे विमानतळावर पुन्हा गांजाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकॉकवरून आलेल्या एका प्रवाशाकडून पुणे विमानतळावर गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचं म्हटलं जातं. हा गांजा मातीशिवाय उगवला जातो. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३४ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

एअर इंडियाच्या विमानातून गांजाची तस्करी...

एअर मार्गाद्वारे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने कारवाई करीत तब्बल ३४ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानातून आरोपींकडून गांजाची तस्करी केली जात होती. बँकॉकवरुन एका हँडबॅगमधून आरोपीने हायड्रोपोनिक गांजा आणला होता. गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला गुप्तचर विभागाने अटक केली आहे. हा गांजा मातीशिवाय उगवला जात असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकॉकवरून येणाऱ्या प्रवाशांकडून पुणे विमानतळावर मोठा गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Pune News : आईशप्पथ! पुणे आहे की शिमला? Video पाहून नागरिक हैराण!

हायड्रोपोनिक गांजा काय आहे? l What is Hydroponic Cannabis?

हा गांजा एका खास व्हरायटीचा असतो. सर्वसाधारणपणे गांजाचं रोप मातीत उगवलं जातं. मात्र हायड्रोपोनिक गांज्याचं रोप विशेष प्रकारच्या सॉल्यूशनमध्ये उगवलं जातं. हायड्रोपोनिक पद्धतीने लागवड केल्यामुळे याला हायड्रो गांजा म्हटलं जातं. ज्या हायड्रोपोनिकमध्ये गांज्याची लागवड केली जाते, त्यात विशेष प्रकारचे पोषक घटक असतात. ही रोपं विशेष प्रकारच्या वातावरणात ठेवली जातात. ज्यामुळे याची वाढ लवकर होते आणि रोप स्वच्छ येतं. या पद्धतीने व्यावसायिकरित्या त्याची लागवड केली जाते. विशेष पोषण तत्व असलेल्या पाण्यात गांजाचं रोप उगवत असतं. मातीपासून वेगळं असल्या कारणाने या रोपात होणाऱ्या आजारांचा धोका संपुष्टात येतो. पेस्ट कंट्रोलची आवश्यकता भासत नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com