Pune News : पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. केतन अग्रवाल या २६ वर्षांच्या तरुणाची त्याची होणारी पत्नी २० वर्षीय सिया गोयल हिने हत्या केली. पुण्यातील प्रसिद्ध लोहगडावरुन केतनला ढकलून देण्यात आलं, यासाठी तिचा प्रियकर चेतन चौधरी याने मदत केली.
या घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. केतन अग्रवाल हिचे वडील व्यावसायिक आहेत. केतनने अमेरिकेत जाऊन एमबीएचं शिक्षण घेतलं, यानंतर तो वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. केतन एकत्र कुटुंबात राहत होता. त्याच्या घरात २० जणं एकत्र आनंदाने राहत होते. केतनचं लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरलं होतं. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं. त्याची तयारी सुरू होती. यासाठी १७ कोटींचा पॅलेस आणि २ विमानंही बुक करण्यात आली होती. लग्नापूर्वीही सिया अनेकदा केतनच्या कुटुंबाला भेटली होती. केतनच्या घरात पुजेसाठी ती आली होती. आम्ही अनेकदा शॉपिंगला एकत्र गेलो. डिनरलाही आमची अनेकदा भेट घेतली. यावेळी ती कुटुंबाशी अत्यंत प्रेमाने वागत असल्याचं केतनच्या आईने सांगितलं. तेव्हाही आम्हाला असं काही घडेल असा संशयही आला नाही.
अग्रवाल कुटुंबाकडून दारू पिण्यास विरोध, पार्ट्यांनाही परवानगी नाही...
केतनच्या हत्येनंतर तिच्या आईने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी सिया आधीच बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्या २० जणांसोबत एकत्र राहत होते. त्यामुळे लग्नानंतर पार्टीला जाण्याची परवानही नसल्याचं केतनच्या आईने सियाला सांगितलं होतं. याशिवाय अग्रवाल कुटुंबात दारू पिण्यासही बंदी होती. मात्र प्रत्यक्षात सियाला दारूचं व्यसन असल्याचं केतनच्या आईने सांगितलं. केतनच्या हत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. ती दारू प्यायची. मात्र गोयल कुटुंबाने ही बाब आमच्यापासून लपवल्याने केतनच्या आईने सांगितलं. त्यामुळे केतनच्या हत्ये प्रकरणात गोयल कुटुंबाला आरोपी करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.