- यशपाल सोनकांबळे,प्रतिनिधी
Pune Ram Navami Violence: पुण्यामध्ये रामनवमीच्या शोभायात्रेला गालबोट लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. बी.टी. कवडे रोड परिसरात उत्सव संपल्यानंतर झालेल्या एका किरकोळ वादातून रक्तरंजित घटना घडलीय. परिसरात 10 ते 15 तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाचं नाव अक्षय गवळी असे आहे. अक्षय हा पुणे येथील शक्तिनगरचा रहिवासी आहे. शोभायात्रा संपल्यानंतर अक्षय जेवणासाठी बाहेर पडला असताना काही तरुणांसोबत त्याची बाचाबाची झाल्याचे म्हटलं जातंय.
कोयत्याने 17 वार, तरुण रक्ताच्या थारोळ्यात
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांसह अक्षयला घेरले. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने जवळपास 17 वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
(नक्की वाचा: Ashok Kharat Case: मोठी बातमी! अत्याचारी बाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? रिपोर्ट समोर)
आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
दोन संशयित ताब्यात, अन्य आरोपी फरारघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर या घटनेत सहभागी असलेले अन्य आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
(नक्की वाचा: Crime News: नाशिकनंतर वसईमधील बाबाची विकृती! 'मी महादेव, तू पार्वती', महिलेसोबत भयंकर घडलं)
Photo Credit: NDTV Marathi
परिसरात तणाव, मोठा पोलीस बंदोबस्त तैनातरामनवमी सोहळ्यादरम्यान झालेल्या या हिंसेनंतर बी.टी. कवडे रोड आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, पोलिसांकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.