जाहिरात

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अत्याचारी बाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? रिपोर्ट समोर

अल्पवयीन मुली, विवाहित स्त्रिया, गरोदर महिलाही नराधम खरातच्या वासनेच्या शिकार झाल्याचं उघड झाले असून त्याचे व्हिडिओही समोर येत आहेत.

Ashok Kharat Case: मोठी बातमी! अत्याचारी बाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? रिपोर्ट समोर

Nashik Ashok Kharat Case Update: नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने या नराधमाने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचं उघडकीस येत आहे. अल्पवयीन मुली, विवाहित स्त्रिया, गरोदर महिलाही नराधम खरातच्या वासनेच्या शिकार झाल्याचं उघड झाले असून त्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. याच प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आहे. 

अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. याचप्रकरणी अशोक खरातच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या होत्या. यापैकी एचआयव्ही चाचणीचा रिपोर्टही समोर आला आहे. नाशिक पोलिसांनी अशोक खरात याची एचआयव्ही टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

Railway News: भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे, लोकल सेवा खोळंबली, नेमकं काय घडलं?

SITला सापडले केस, गंडे दोरे..  

दुसरीकडे,  एसआयटीकडून अशोक खरातच्या नाशिकच्या ओकस कार्यालयात जवळपास दीड तास झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्या कार्यालयातून तंत्र मंत्र करण्यासाठीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये तांब्याची एक बाटली, गंडे दोरे, खडे तसंच काही महिलांचे केसही हाती लागले आहेत.

महागडी कस्तुरीच्या नावाने बाबा बोगस कस्तुरी बनवत होता असा तपास यंत्रणांना संशय असून ते बनवण्यासाठीचे कच्चामाल तसंच अत्तराच्या काही बाटल्या सुद्धा मिळून आल्या आहेत. पूजा विधी आटोपल्यानंतर बाबा वापरत असलेले हँड सॅनिटायझर सुद्धा जप्त करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांची काही कागदपत्रही मिळाल्याचं बोलले जात आहे. 

Sangli Crime: महाराष्ट्र हादरला! बापाने 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, पुढे खूपच भयानक घडलं, धक्कादायक कारण...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com