Pune News : शालेय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; शेजारील बाकावर बसले अन्... संतापजनक प्रकार

एका शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Pune News : पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगावमध्ये एका शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शाळेत आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रशांतकुमार हरिश्चंद्र गावडे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थिनीसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न...

१८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी शाळेत प्रदर्शनाची तयारी करत होती. याचवेळी आरोपी शिक्षक ज्या ठिकाणी विद्यार्थिनी होती त्या रूममध्ये आला आणि आपण दोघे मिळून या स्पर्धेचे नंबर ठरवू असं म्हणत या विद्यार्थिनीशी त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शेजारील बाकावर बसून पीडितेचा उजवा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले असा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.

नक्की वाचा - Pune News : 'आम्ही इथले भाई आहोत' फुशारकी मारणाऱ्या तरुणांची गुंडगिरी पोलिसांनी अशी उतरवली

याप्रकरणी दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article