Pune News: भीती अन् दहशत! आता घरातून बाहेर पडणं ही अवघड, कोयता गँगने या वेळी जे काही केलं...

या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार

पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. पुणे तसं विद्येचं माहेरघर. पण गेल्या काही काळात पुण्याची ही ओळख पुसली जात आहे. त्याची जागा क्राईम सीटीने घेतली आहे. त्यासाठी पुण्यात होणार गँगवॉर असेल, खून असतील, अपघात असतील, बलात्काराच्या घटना असतील, वेगवेगळ्या टोळ्यांची दहशत असेल या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यात कोयता गँगने तर आपली एक वेगळीच दहशत निर्माण केली आहे. काही दिवस शांत राहील्यानंतर ही गँग पून्हा एकदा सक्रीय झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी जे काही केलं त्याची कल्पना ही तुम्ही करू शकणार नाही. त्यामुळे भीती आणि दहशतीचं वातावरण आहे. शिवाय घरातून आता बाहेर पडायचं की नाही असा प्रश्न पडला आहे.   

शहरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांची दहशत सातत्याने वाढत आहे. काल म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री एरंडवणे परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या टोळक्याच्या हातात कोयते आणि दांडके होते.  सशस्त्र असलेल्या या गुंडांनी परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमध्ये हैदोस घातला. यावेळी त्यांनी बारमध्ये असलेल्या लोकांना धमकावलं. त्यांना शस्त्र दाखवली. ऐवढेच नाही तर फोडतोड ही केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तिथे उपस्थित असलेले ग्राहक हादरून गेले.  

नक्की वाचा - CIDCO ची नवी टाऊनशिप कुठे? एकाच ठिकाणी असेल शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अन् बरचं काही, जाणून घ्या आतली बातमी

या टोळक्यांनी कोयत्याचा धाक दाखवत बारमधील काही रक्कम लंपास केली. घटनास्थळावरून किती रक्कम पळवली गेली किंवा इतर काही ऐवज चोरीला गेला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती पोलीसांनी दिलेली नाही. डेक्कन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळपासून घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण माहिती गोळा करत आहेत. लवकरच याबाबतचा अधिकृत खुलासा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण पोलीसांच्या नाकावर टिच्चून अशा घटना पुण्या सारख्या शहरात होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे. 

Advertisement

नक्की वाचा - MNS Rada: मनसेचा 'खळ्ळखट्याक' पॅटर्न! गिरगावातील गुजराती रेस्टॉरंटमध्ये मराठी भाषेवरून तुफान राडा

या घटनेचं सीसीटीव्ही समोर आले आहे. एक व्यक्ती पहिल्यांदा बारमध्ये शिरताना दिसत आहे. त्या मागोमाग त्याचे सहकारी बारमध्ये घुसले. या सर्वांनी कोयते आपल्या सोबत ठेवले होते. आत  गेल्यानंतर त्यांनी कोयता बाहेर काढला. त्यानंतर उपस्थित असलेली ग्राहक घाबरले. काय करावे हे त्यांना समजले नाहीत. ते गुंड त्यांना धमकावत होते. तोडफोड करत होते. सर्वच जण या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरले होते. त्याचा फायदा घेवून या गुंडांनी तिथे असलेली रोख रक्कम लांबवली आहे. त्यामुळे व्यवसाय करायचा की नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय असा बार किंवा हॉटेलमध्ये जायचे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.