Pune News: आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून पुण्यात तिसरी हत्या, पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर?

अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, मयूर वाघमारे आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण पाच आरोपी अटकेत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे 

पुण्यात गँगवॉरने पुन्हा डोकं वर काढल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गँग पुण्यात अस्तित्वात आहेत. पण सध्या तो मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातूनच एकमेकांचा बदला घेण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे. त्यातून हत्या ही होताना दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकात घडली आहे. 4 जण दोन दुचाकीवर आले. त्यानंतर त्यांनी  जवळपास 9 गोळ्या झाडल्या. त्यातल्या 2 गोळ्या त्या व्यक्तीला लागल्या. शिवाय कोयत्यानेही हल्ला चढवला.  त्यात गणेश काळे याचा मृत्यू झाला आहे. याला ही गँगवॉरच्या बदल्याची किनार आहे. 

समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे. ज्याने वनराज आंदेकरची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशहून 10 पिस्टल पुरवल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळेची हत्या करण्यात आली. गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे. गणेश काळेची निर्घून हत्या केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले होते. मात्र त्यांना थोड्याच वेळात अटक करण्यात आली.  हत्या करताना वापरलेल्या दोन पैकी एक गाडी जप्त करण्यात आली आहे. अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल, मयूर वाघमारे आणि दोन अल्पवयीन आरोपी असे एकूण पाच आरोपी अटकेत आहेत. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की नेमका कधी पासून हा कट रचला जात होता. या मागचा सूत्रधार नक्की कोण आहे याचा ही छडा लावला जात आहे. या आरोपींना सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  पुणे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातून हे स्पष्ट झालं आहे की वांजराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे. समीर काळेने वनराजच्या हत्येसाठी लागणारी हत्यारं पुरवली होती. त्याचा बदला गणेश काळेचा सख्खा भाऊ समीर काळे याचा खून करून घेण्यात आला. 

नक्की वाचा - Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

पण शेवटी प्रश्न असाच आहे की अनेक छोट्या मोठ्या टोळ्या या सक्रिय आहेत.  एकमेकांचा बदला घेण्यासाठी शस्त्र पुरवण किंवा लहान मुलांचा समावेश करून घेणं यामुळे पुण्याची तरुणाई कुठल्या दिशेने जात आहे? पोलिसांचा वचक कमी पडला आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होतो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आत्ता सध्यस्थीतीला मोठ्या टोळ्यांचे म्होरके हे जेल मध्ये असूनही असे प्रकार घडत आहेत. मग जर हे टोळीप्रमुख किंवा टोळीतले मुख्य गुंड गजाआड असतील तरी अश्या घटना होत आहेत. त्यामुळे पुण्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय अशी चर्चा आहे. 

Advertisement