सूरज कसबे
ऑनलाईन गेमींग असो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो याच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात आपण सहज येतो. त्यातू मैत्री ही होते. याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे ही आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या अनेक घटना ही समोर आल्या आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचे प्रकारही घडले आहेत. असाच काहीसा पण धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. पोलीसांनी मात्र या प्रकरणात वेळीच कारवाई करत पुढचा अनर्थ टाळला आहे.
चिराग राजेंद्र थापा हा जेमतेम 21 वर्षाचा तरूण आहे. त्याची एक आठवड्या पूर्वी एक तरुणी सोबत ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाली. ओळख वाढत गेली. एक दिवस त्याने त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनून डेटवर येईशील का अशी विचारणा केली. पण त्या तरूणीने त्यासाठी नकार दिला. त्यामुळे चिरागचा हिगो हर्ट झाला. त्याला तिचा प्रचंड राग आला. तिला अद्दल घडवायची असं त्याने ठरवलं. त्यासाठी त्याने डोक्यात एक खतरनाक प्लॅन तयार केला.
नक्की वाचा - Pune News: गावगुंडाची दहशत, शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड, थरारक CCTV आला पुढे
तरूणीने दिलेला नकाराचा त्याच्या मनात राग होता. मग चिरागने तरुणीच्या नावाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तब्बल 13 बनावट अकाऊंट्स (Accounts) तयार केली. या अकाऊंट्सच्या माध्यमातून त्याने एआय (AI) चा वापर करून त्या तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ (Morph) केले. शिवाय ते फोटो त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले. इतकेच नाही, तर त्याने तरुणीच्या मैत्रिणीचेही असेच मॉर्फ केलेले फोटो तयार केले.
त्या मॉर्फ केलेल्या फोटोच्या सहाय्याने त्याने पिडीत तरूणीच्या मैत्रिणींना धमकावले. तुमच्या मैत्रिणीला माझ्या सोबत बोलायला सांगा नाही तर तुमचे ही फोटो व्हायरल करेन असे त्याने त्यांना धमकी दिली. हा प्रकार इतका टोकाला गेली की शेवटी पीडित तरूणीने बावधन पोलिस ठाण्यात धाव घेतली. झालेला सर्व प्रकार तिने पोलीसांना सांगितलं. त्यावरून फिर्याद दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून चिराग थापाला विरार येथून ताब्यात घेतले आहे.