Pune News: पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणी सुरु होता कुंटणखाणा, 'त्या' 3 महिलांचं कनेक्शन आलं समोर, पोलिसही हादरले

पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यांवर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.पोलिसांनी चार फ्लॅट एक वर्षासाठी सील केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Budhwar Peth Crime News
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

Pune Crime News Today : पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यांवर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.पोलिसांनी चार फ्लॅट एक वर्षासाठी सील केले आहेत. अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.या महिला मागील एक महिन्यापासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्यास होत्या. या महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या, अशी माहितीही आहे.महिलांकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले काय म्हणाले?

"बांगलादेशी नागरिक शोधण्याचं काम पुणे शहरात जोरात चालू आहे. यामध्ये ज्या बांगलादेशी महिला बुधवार पेठेत रहिवास करतात किंवा तिकडे व्यापार वगैरे करतात.त्यांनाही शोधण्याचं काम दररोज चालू आहे. मध्यंतरी आपण बांगलादेशी महिलांना शोधून काढलं. तसच अल्पवयीन महिला तिथे राहत होत्या त्यांनाही सोडवण्यात आलं आहे.काही भागात काही इमारती आहेत, त्या अपार्टमेंट या महिलांसाठी वापरल्या जातात. त्याच्या मालकी हक्काची माहिती घेतली आहे. या इमारती कशासाठी वापरतात,याची माहिती घेतली.

नक्की वाचा >> Thane News: टिटवाळ्यातील वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह मुरबाडमध्ये सापडला, पोटच्या मुलीनं केलं असं काही..

आमच्या शोधमोहिमेत तीन बांगलादेशी महिलांना पकडलं आहे. बांगलादेशहून या महिलांना आणलं जातं. तेथून पश्चिम बंगालकडे आणलं जातं. तिथले एजंट्स भारतातील इतर जागांवर बंगळुरु,पुणे,मुंबई-दिल्ली असेल अशा ठिकाणी त्यांना घेऊन जाण्याचं काम करतात. काही एजंटवर कारवाई सुरु आहे. वेगवेगळ्या कारणांनी बांगलादेशी इथे येत आहेत.मागील काही महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त बांगलादेशी पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून बांगलादेशी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे", अशी माहिती झोन एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Thane News: पळसाच्या पानांसाठी 2 महिला जंगलात गेल्या..'तो' दबक्या पावलांनी जवळ आला, महिलेनं कोयता काढला अन्..