Pune News: पुण्यात कार खरेदी करताना सावध राहा, ग्राहकांची होतेय फसवणूक; पोलिसांनी चाकणमध्ये टोळीला पकडलं

पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात बनावट नोटांच्या माध्यमातून कार खरेदी करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Fake Currency Busted
पुणे:

Pune Crime News Today :  पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात बनावट नोटांच्या माध्यमातून कार खरेदी करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बारामतीहून कार विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तब्बल 42 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रोकडमध्ये बनावट नोटा असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गणेश ठाकरे आणि समीर महल्ले अशी आरोपींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,बारामतीहून एक व्यक्ती कार विक्रीसाठी चाकण परिसरात आला होता.कार खरेदीच्या बहाण्याने आरोपींनी त्याच्याशी व्यवहार केला.व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आरोपींनी पैशांची रोकड दिली. या पैशांच्या बंडलमध्ये खऱ्या नोटा ठेवून मधोमध बनावट नोटा ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Video: 'सर्व पुरुष एकसारखे...', रात्री 3 वाजता घडलेल्या प्रसंगाबाबत तरुणीनं सर्वच सांगितलं, " 2 अज्ञातांनी.."

42 लाख रुपयांची बनावट रोकड जप्त

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने चाकण पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली. या कारवाईत जवळपास 42 लाख रुपयांची बनावट रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपी गणेश ठाकरे आणि समीर महल्ले यांच्याकडून कार व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा >> Palghar News : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील हॉटेलमध्ये भयंकर घटना, माणुसकीला काळिमा फासल्याने नागरिकांमध्ये संताप

दरम्यान,पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा बनावट असल्याचे सांगितले असले तरी गुन्ह्याच्या नोंदीमध्ये त्याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचे समोर येत आहे.त्यामुळे या नोटा खरोखर बनावट आहेत का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.