रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Police : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलीस सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. कोम्बिंग ऑपरेशनहून परत येत असताना पोलिसाला चार जणांनी मारहण केल्याची घटना उघड झाली आहे.
पुण्यातील सेनापती बापट रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रूपेश मांजरेकर, अनिकेत घोडके, आणि अभिजीत डोंगरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. मारहणार करणारे सर्व आरोपी दारुडे असल्याची माहिती मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वीही घडले प्रकार
पुण्यात पोलिसांवर हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी याच महिन्यात 7 तारखेला (7 फेब्रुवारी 2025) हा प्रकार घडला होता. हडपसरमधील फुरसुंगी परिसरात मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांच्या हवालदाराने अडवले होते. त्यानंतर त्याने त्या हवालदाराच्या डोक्यात दगड घातला होता. राजेश गणपत नाईक असं या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव होते. आदिनाथ उर्फ बबलू भागवत मसाळ असं या प्रकरणातील आरोपीचं नाव होतं. त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.
यापूर्वी ऑगस्ट 2024 मध्ये पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीशक रत्नदीप गायकवाड जखमी झाले होते. रामटेकडी परिसरात भांडण सुरु असताना एका टोळीतील तरुणाला पकडण्यासाठी गायकवाड गेले होते. त्यावेळी त्यांच्यावरच कोयत्यानं हल्ला करण्यात आला होता.
( नक्की वाचा : Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड! वाचा कशी होती चोरीची पद्धत)
या घटना पुणेकरांच्या आठवणीत ताज्या आहेत. त्याचवेळी आणखी एकदा पोलिसाला मारहाण झाली आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.