Pune News : पुण्यात खळबळ, रिच फिल स्पा सेंटरवर छापा टाकताच पोलिसही हादरले, आतमध्ये सुरु होता भयंकर प्रकार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपरीतील रिच फील स्पा सेंटरवर धडक कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Spa Center Crime Story
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Crime News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपरीतील रिच फील स्पा सेंटरवर धडक कारवाई केली आहे.स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार,संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट चौक येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची खात्री केली आणि त्यानंतर छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी स्पा मॅनेजरला अटक केली असून चालकावर गुन्हा दाखल केला आहे .

मॅनेजरसह स्पा चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

स्पा मॅनेजर अक्षय महादेव सुतार आणि स्पा चालक मयुर दिनेश मोहिते या आरोपींविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 143 (3) 3 (5) आणि पिटा 3,4 5,7  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आला आहे. ही कारवाई पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: बोगद्याला मोठं छिद्र! पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता 'रूट मार्कर' बसणार, नागरिकांनाही..

दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने जानेवारी 2026 ते आज मितिला मार्च 2026 अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकुण 8 आस्थापनांवर छापे टाकुन भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात एकूण 6 मसाज पार्लर/स्पा,2 हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सदर 8  गुन्हयांमध्ये एकुण 20 आरोपींना अटक करण्यात आली असुन 17 पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. ही धडक कारवाई भविष्यात देखील अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी म्हटले आहे.

नक्की वाचा >> अशोक खरातचे VIDEO शेअर करत असाल तर सावधान! पोलिसांकडून दोघांना अटक