Pune Police Big Action : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या १०५ जणांच्या टीमने शेजारील राज्यात जाऊन मोठी कारवाई केली. यासाठी पुणे पोलिसांनी ड्रोन, मेटल डिटेक्टरची मदत घेतली. ही मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईअंतर्गत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २१ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई...
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावात कारवाई केली आणि शस्त्र बनविणाऱ्या ५० भट्ट्या उद्धवस्त केल्या. मध्य प्रदेशातील एक मोठे अवैध शस्त्रास्त्र पुरवठा आणि तस्करी करणारे रॅकेट नष्ट करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसात विमानतळावरील पोलीस, खंडणीविरोधी पथकाने २१ शस्त्रे जप्त केली होती. पुण्यातील ही शस्त्र उमरटीतून येत होती, अशी माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांनी याचा माग काढला, तर याची सूत्र शेजारील राज्यात असल्याचं समोर आलं.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर
ड्रोन वापरला अन् गावावर टाकला छापा
पुणे पोलिसांनी या कारवाईसाठी ड्रोनची मदत घेतली. उमरटी गावाजवळ गेल्यानंतर आधी ड्रोनने पाहणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे गावावर छापा टाकत शस्त्र तयार करणारा कारखाने उद्ध्वस्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील ५० घरांची झडती घेण्यात आली होती. या घरांमध्ये पिस्तुल निर्मितीचं साहित्य, शस्त्राचे सुटे भाग यांचा समावेश होता. तर अनेक घरांमध्ये भट्ट्याही होत्या.