Pune rave party : आताची मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

या रेव्ह पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिचा पती प्रांजल खेवलकर याचा सहभाग होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune rave Party : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करीत ही पार्टी उद्ध्वस्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग होता.  

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिचा पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) याचा सहभाग होता. 

नक्की वाचा - Crime News: CBI ची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम रॅकेट उध्वस्त, 3 अटकेत

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या फ्लॅटमध्ये अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली येथे रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता.

Advertisement

२६ जुलै रोजी रात्री उशीरा ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमद्ये अमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर यांचा सहभाग होता. पुणे पोलिसांनी हाऊस पार्टीतून प्रांजल खेवलकरांसह आणखी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची तपासणी सुरू आहे. 

Topics mentioned in this article