'तू मला आवडतेस', स्कूल व्हॅन चालकाचा मेसेज, विद्यार्थिनी घाबरली, पुण्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातून (Pune Crime) संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातून (Pune Crime) संतापजनक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील प्रकरण ताजं असताना राज्यातील शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. बऱ्याचदा जवळील लोकांकडून बालवयात मुलींवर अत्याचार केले जातात. त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभरासाठी भोगावा लागतो. या घटना रोखणं गरजेचं आहे, अन्यथा उमलण्यापूर्वीच कळ्यांना तोडण्याचं दुष्कृत्य वारंवार घडत राहील. 

पुण्यातूनही शाळकरी मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे स्कूल व्हॅन चालक विद्यार्थिनीला त्रास देत होता. वडिलांच्या वयाचा असलेला हा चालक तिला घाणेरडे मेसेजेस करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मनसैनिकांनीही त्याला चोप दिला आहे. 

नक्की वाचा - जेवणासाठी वहिनीला झोपेतचं संपवलं, 'ते' कृत्य लागलं जिव्हारी; पुण्यातील संतापजनक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने शालेय विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेजेस केले होते. प्रत्यक्ष आणि इन्स्टाग्रामवर तो सतत मेसेज करून तिला त्रास देत होता. शेवटी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित स्कूल व्हॅन चालकाला मनसेच्या गणेश भोकरे यांनीही चोप दिला आहे. मनसैनिकानी संबंधित स्कूल बस चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यातही मुलींना छेडण्याचे प्रकार सुरू असल्याने यावर कडक कारवाई करावी जेणेकडून अशा घटना वारंवार घडणार नसल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.