पुण्यातील शनिपारमधील मुलींच्या वसतिगृहाला आग; एकाचा मृत्यू, 42 जणी बचावल्या

ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. इमारच्या दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहात 42 विद्यार्थिनी राहत होत्या.

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

पुण्याच्या शनिपार भागात गुरुवारी रात्री उशिरा शनिपार भागात पाच मजली इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या इमारतीत मुलींचं वसतिगृह होतं, येथील तब्बल 42 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. इमारच्या दुसऱ्या मजल्यावरील वसतिगृहात 42 विद्यार्थिनी राहत होत्या. आग लागताच त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर स्थानिकांनी विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढलं. दरम्यान आग विझवत असतानाना येथील इमारतीचा सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अद्याप आगीचं कारण कळू शकलेलं नाही, अधिकारी यासंदर्भात तपास करीत आहेत. 

बातमी अपडेट होत आहे. 
 

Topics mentioned in this article