Pune News : पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला बायकोनेच प्रियकराच्या मदतीने संपवलं; हत्येचं कारण धक्कादायक

Pune News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News: पोलिसांनी याप्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांना अटक केली आहे.
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. ही हत्या नकुल यांची पत्नी चैताली भोईर हिने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने केल्याचं चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती, मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

पोलिसांनी अत्यंत वेगात तपासची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली. चैतालीने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याच्या मदतीने नकुलचा खून केल्याचं उघड झालं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ दीपक पवार यालाही बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Pune MHADA : पुणे म्हाडा लॉटरीचे 'द्वार' आणखी उघडले! 'या' तारखेपर्यंत अर्ज करा; घराचं स्वप्न होईल पूर्ण )
 

पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला वारंवार काही गोष्टींवरून हटकत होते. नकुल तिला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत न फिरण्याबद्दल आणि कर्ज न काढण्याबद्दल समजावत होते. याच गोष्टींचा राग चैतालीच्या मनात होता. याच रागातून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने नकुलचा जीव घेतला.

चिंचवड पोलिसांनी केलेल्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पत्नीला नगरसेवक करण्याची होती इच्छा

मृत नकुल भोईर यांचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये जिकरीने सहभाग घेतला होता. विविध संघटना आणि राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते. नकुल यांनी सामाजिक कार्याचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी आपल्या पत्नीला नगरसेवक बनवण्याचे ठरवले होते. यासाठी आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या पत्नीला निवडणुकीत उभे देखील करणार होते. मात्र त्याआधीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : 'नो डॉक्युमेंट, नो माघार!' 'जैन बोर्डिंग'साठी देशभरातील समाज करणार उपोषण )
 

चिंचवड पोलिसांनी केलेल्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Topics mentioned in this article