Chhaava Films : छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. शंभुराजांनी स्वराज्यासाठी स्वत:च्या रक्ताचं पाणी केलं. त्यांना मिळालेल्या मरणयातना पाहताना थिएटरमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारे जण आवर्जुन चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोक्काचा आरोप असलेले दोघेजण छावा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. हे दोघेही सराईत गुन्हेगार पुण्यातील हडपसर वैभव टॉकीजमध्ये आले होते. सध्या छावा चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. त्यांनाही छावा पाहण्याची इच्छा झाली. पोलिसांनीही गनिमी कावा आखत या दोन्ही गुन्हेगारांना पकडलं. शेवटी थिएटरमध्येच दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
नक्की वाचा - Vineet Kumar Singh: कवी कलशची भूमिका करणारा अभिनेता म्हणतो 11 मार्चला फ्रेंडशिप डे साजरा करा, कारण काय?
धर्मेणसिंह उर्फ भगतसिंह भादा (22) आणि बादशाहसिंह भोंड (23) असे दोन्ही आरोपींची नावं आहे. दोघेही वैभव टॉकीजमध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. या दोघांवर MCOCA, NPDS, आणि शस्त्र कायद्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. भादा आणि भोंड हे दोघेही आरोपी छावा चित्रपट पाहायला आले होते. दरम्यान पोलिसांना याची टीप मिळाली.
शेवटी 21 फेब्रुवारीला कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेच्या यूनिट 6च्या पथकाने त्या दोघांना थिएटरमध्ये जाऊन अटक केली. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना दिघी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.