पुण्यात गुन्हेगाराच्या बर्थडेचा थाट, उच्चभ्रू भागात डीजे पार्टीचं आयोजन, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन

पुण्यातील विमाननगर आणि कल्याणी नगर हा उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो. मात्र हा भाग आता पार्टी हब झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Crime News एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे (Pune Crime) शहर गेल्या काही काळात गुन्हेगारांच्या घटनांमुळे अधिक चर्चेत येत आहे. पुण्यात दरवर्षी लाखो तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात येत असतात. अगदी देशभरातून मोठ्या संख्येने तरुणवर्ग पुण्यात येत असतो. अशातच पुण्यातील गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराचा घटना असो वा कोयता गँगची दहशत. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. पुण्यात पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. 

पुण्यातील विमाननगर आणि कल्याणी नगर हा उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो. मात्र हा भाग आता पार्टी हब झाला आहे. विमाननगरमधील एका पबमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी आयोजित करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस स्टेशन येथून हाकेच्या अंतरावर असताना बर्थडे पार्टीचा गोंधळ सुरू होता. बर्थडे करणाऱ्या भाईच्या पेनटरने सर्व व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले होते.

नक्की वाचा - विसापूर किल्ल्यावर चढायला मित्रांनी चुकीची पायवाट निवडली; 29 वर्षीय पर्यटकाचा जागीच मृत्यू

काय आहे प्रकरण?   

शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकातल्या "Three Musketeers" या पबच्या पार्किंगमध्ये काही कथित ‘भाई' लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातला. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे, फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत (सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा निर्माण करणे) गुन्हा दाखल आहे. मात्र तरीही आरोपी मोकाट असून पार्टी करीत परिसरात गोंधळ घातलाना दिसत आहे. गुन्हेगाराकडून व्हिडिओच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे काम केलं जात असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
 

Topics mentioned in this article