सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीबाबत भयंकर घडलं,पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : पुण्यातील महाविद्यालयीन तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून चार तरुणांशी ओळख झाली होती.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune News : सोशल मीडियाचा वापर हा समंजसपणे करण्याची गरज या विषयातील तज्ज्ञ वारंवार व्यक्त करतात.या आभासी क्षेत्रामध्ये भेटणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. ही सावधगिरी बाळगली नाही तर काय होतं याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलं आहे. 

पुण्यातील हा महाविद्यालयीन तरुणीवर सोशल मीडियातून मैत्री झालेल्या चार तरुणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून त्यामधील 2 आरोपी अल्पवयीन आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एप्रिलपासून सुरु होता प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या "गुड टच बॅड टच" या उपक्रमातून ही घटना समोर आली. 

हा सर्व प्रकार एप्रिलपासून सुरु होता, अशी माहिती आता उघड झाली आहे. डित तरुणी तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली.या प्रकरणातील आरोपी तरुणांची एकमेकांशी ओळख नाही. पीडित तरुणीला भेटायला आलेल्या एका आरोपीनं तिच्यावर कॉलेजमध्येच अत्याचार केले.  तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 आरोपींनी देखील तिच्याशी अनेक ठिकाणी तिला नेत तिच्यावर अतिप्रसंग केला.

(नक्की वाचा : अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण, 12 तासांमध्येच...)
 

कशी झाली घटना उघड?

पीडित तरुणीनं या सर्व घटना तिच्या मैत्रिणीला सांगितल्या. त्याचबरोबर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या  'गुड टच बॅड टच अभियाना'त समुपदेशकाला सांगितल्या. त्यानंतर हा प्रकरा उघडकीस आला. पीडित तरुणीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.  
 

Topics mentioned in this article