जाहिरात

Live In Murder : लिव्ह-इन पार्टनरचा क्रूर शेवट! लग्नाच्या मागणीवरून प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे केले 7 तुकडे

Live In Murder : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला लग्नासाठी दबाव टाकणे खूप महागात पडले.

Live In Murder : लिव्ह-इन पार्टनरचा क्रूर शेवट! लग्नाच्या मागणीवरून प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे केले 7 तुकडे
Live In Murder : चनाला उपचारांच्या बहाण्याने कारमधून नेले आणि रस्त्यातच तिचा गळा दाबून खून केला.
मुंबई:

Live In Murder : पहिल्या पतीशी घटस्फोट आणि दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला लग्नासाठी दबाव टाकणे खूप महागात पडले. महिलेच्या हट्टामुळे त्रासलेल्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने तिचा गळा दाबून खून केला. हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे सात तुकडे केले आणि ते पोत्यांमध्ये भरून विहिरी आणि नदीत फेकून दिले. 

13 ऑगस्ट रोजी झाशी जिल्ह्यातील टोडीफतेहपूर पोलीस स्टेशन परिसरातील किशोरपुरा गावात शेतातल्या विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह दोन पोत्यांमध्ये भरलेला आढळला. मृतदेहाचे पाय आणि डोके गायब असल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवणे कठीण झाले होते.

काय आहे प्रकरण?

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला. त्यामध्ये त्यांना काही धागेदोरे मिळाले. त्यानंतर सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला. एसएसपीने सांगितले की, तो मृतदेह मध्यप्रदेशच्या टीकमगढ येथील 35 वर्षीय रचना यादवचा होता. तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती टोडी फतेहपूर परिसरात राहणाऱ्या शिवराज यादवसोबत राहू लागली होती आणि दोघांनी लग्न केले होते. याच दरम्यान शिवराजचा मृत्यू झाला. 

त्यानंतर ती दोन वर्षांपूर्वी महेबा गावातील माजी सरपंच संजय पटेलच्या संपर्कात आली. दोघे गावाबाहेर लिव्ह-इनमध्ये राहू लागले. त्यानंतर रचना संजयवर लग्नासाठी दबाव टाकू लागली, परंतु आधीच विवाहित असलेला संजय तिच्याशी लग्न करू इच्छित नव्हता. तरीही रचना हट्टाला पेटली होती. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी संजयने त्याचा नातेवाईक संदीप पटेल आणि मित्र दीपक अहिरवार यांच्यासोबत मिळून रचनाला संपवण्याची योजना आखली.

( नक्की वाचा : Nora Fatehi : बायकोनं नोरा फतेही सारखं दिसावं म्हणून 3 तास जिम करायला लावायचा नवरा ! वाचा काय आहे प्रकरण? )

असा झाला रचना यादवचा खून

तिघांनी रचनाला उपचारांच्या बहाण्याने कारमधून नेले आणि रस्त्यातच तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दीपक अहिरवारने रचनाच्या मृतदेहाचे 7 तुकडे केले आणि पोत्यांमध्ये भरले. धड आणि हात तीन पोत्यांमध्ये भरून गावाबाहेरील शेतातील विहिरीत फेकले, तर डोके आणि पाय वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून रेवन नदीत फेकले. 13 ऑगस्ट रोजी विहिरीत मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आसपासच्या गावांमधून हरवलेल्या महिलांची माहिती घेतली.

Latest and Breaking News on NDTV

याचदरम्यान महिलेच्या भावाला माहिती मिळाल्यावर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. सुगावा मिळताच पोलिसांनी संजय पटेलची चौकशी केली असता तो गोंधळून गेला. त्यानंतर कठोर चौकशी केल्यावर त्याने सर्व सत्य सांगितले. पोलिसांनी संजय आणि संदीपला अटक केली आहे, तर 21 ऑगस्ट रोजी पोलिसांनी दीपक अहिरवारला चकमकीत पकडले.

( नक्की वाचा : Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं... )

झाशीचे एसएसपी बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, रचना यादव खून प्रकरणात फरार असलेल्या 25,000 रुपयांच्या इनामी आरोपी प्रदीप उर्फ दीपक अहिरवारसोबत रात्री उशिरा पोलिसांची चकमक झाली. आरोपीच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दीपकच्या पायाला गोळी लागली. त्याला अटक करून मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. जखमी मारेकऱ्याकडून एक गावठी कट्टा, काडतुसे आणि नंबर नसलेली बाईक जप्त करण्यात आली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com