
Radhika Yadav Murder Case: हरियाणाची राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवच्या निर्घृण हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. राधिका यादवचा जन्मदात्यानेच गोळ्या झाडून खून केला. या हत्येची त्यांनी कबुलीही दिली असून पोलीस तपासात अनेक नवनव्या बाबी समोर येत आहेत. अशातच आता युट्यूबवरील एका गाण्यामुळे राधिकाचा जीव गेल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. काय होता तो व्हिडिओ? जाणून घ्या...
राधिकाच्या व्हिडिओमध्ये असे काय होते?
इनाम उल हक नावाच्या कलाकारासोबत राधिकाने कारवा (Karwaan Music Album) नावाचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज केला होता. या गाण्यामध्ये राधिका आणि इनामची अनेक एकत्रित दृष्ये होती, ज्यामध्ये त्यांची प्रेमळ केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. एक वर्षापूर्वी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. मात्र राधिकाच्या वडिलांना हा म्युझिक व्हिडिओ आवडला नव्हता. वडिलांनी राधिकाला तिच्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितल होते, परंतु राधिकाने तसे करण्यास नकार दिला. या प्रकरणावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला.
एनडीटीव्हीशी बोलताना इनाम-उल-हकने सांगितले की आतापर्यंत तो राधिकाला फक्त दोनदा भेटला होता आणि ते फक्त व्यावसायिक भेटले होते. इनामने सांगितले की त्याने राधिकाशी शेवटचे तीन महिन्यांपूर्वी बोलले होते आणि तेही एका जाहिरातीच्या चित्रीकरणाबद्दल. इनामने सांगितले की ती तिच्या एका मैत्रिणीला सांगेल कारण ती सध्या शूटिंग करू शकत नाही.
Radhika Yadav : टेनिसपटूचा 'तो' निर्णय ठरला वडिलांच्या संतापाचं कारण, लेकीवरच झाडल्या 5 गोळ्या
याबाबत बोलताना इनामने सांगितले की जेव्हा राधिकासोबत म्युझिक व्हिडिओ शूट केला गेला तेव्हा तिची आईही तिच्यासोबत आली होती. राधिकाने त्या म्युझिक व्हिडिओचे जास्त प्रमोशन केले नाही, त्यामागील कारण सांगितले नाही. राधिका या गाण्याच्या शूटिंगदरम्यान जास्त बोलत नव्हती, ती शांत-शांत असायची असं तो म्हणाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world