जाहिरात

Trending News: राहुल महाजन पुन्हा चर्चेत! चक्क अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, डॉनचा पारा चढला अन्

सालेम म्हणाला तुम्ही नक्की काय पाहीलं. त्यावर निकम यांनी सांगितले की ती एका मुलाच्या जास्त जवळ जात होती.

Trending News: राहुल महाजन पुन्हा चर्चेत! चक्क अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, डॉनचा पारा चढला अन्
  • राहुल महाजन आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
  • अभिनेत्री मोनिका बेदीचा अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत प्रेमसंबंध होते
  • मोनिका बेदी बिग बॉस २ मध्ये सहभागी झाली होती आणि तिथे राहुल महाजन तिच्या जवळ गेला होता
मुंबई:

राहुल महाजन आणि वाद म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जात होत्या. कोणती ही गोष्ट असो राहुल महाजनचं नाव आलं तर त्याच्या सोबत आपोआप वाद जोडला जात असे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धी पासून दुर असलेल्या राहुल महाजन यांची पुन्हा एकदा चर्चा होवू लागली आहे. त्याला निमित्त आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकतीच एक दिलेली मुलाखत. या मुलाखीतीत त्यांनी  काही भन्नाट खुलासे केले आहेत. त्याला राहुल महाजन यांचा संदर्भ आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

अभिनेत्री मोनिका बेदी ही बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या उंचीवर होती. त्यावेळी तिचे आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांचे प्रेम संबंध सुरू होते. डॉन तिच्या सौंदर्यावर भाळला होता. शिवाय मोनिका ही त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकली होती. काही काळ ते दोघे परदेशात राहीले ही होते. मात्र नंतर त्यांना अटक झाली. त्यांना भारतात आणलं गेलं. त्यानंतरचा हा किस्सा आहे. त्यावेळी अबू सालेम हा जेलमध्ये होता. तर मोनिका बेदी ही बाहेर. ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिला बिग बॉस 2 मध्ये घेण्यात आलं होतं. 2008 सालची ही गोष्ट आहे.  याबाबतच उज्ज्वल निकम यांनी मोठा खुलासा केलाय. त्यांनी याबाबत अबू सालम याच्याशी ही बातचीत केली होती. 

नक्की वाचा - Maharashtra Rain : पाच-सहा दिवस वाट बघा..सलग 9 दिवस महाराष्ट्रात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा मोठा अलर्ट

मोनिका बेदी बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. त्यात ती राहुल महाजन यांच्या जास्त जवळ गेली होती. राहुल महाजन ही तिच्याकडे आकर्षीत झाला होता. तो नेहमी या शो मध्ये तिच्या सोबत तिला आधार देताना दिसला. इतकचं काय तर त्याने प्रपोज ही केलं होतं. हे सर्व काही शो मध्ये पाहीलं गेले. याची माहिती जेलमध्ये असलेल्या अबू सालेमला ही समजत होती. राहुल महाजन मोनिकाच्या जवळ जात आहे हे गोष्ट त्याला खटकली. त्याला हे पटलं नाही. त्याल राहुल महाजन आणि मोनिका बेदीचा प्रचंड राग आला होता. याबाबत स्वत: अबू सालेम निकम यांच्यासोबत बोलला होता.   

नक्की वाचा - Ashadhi Wari: आळंदी ते पंढरपूर, माऊलींसाठी रांगोळीच्या पायघड्या! 15 वर्षापासून सेवा करणारी तरुणी

निकम यांनी या मुलाखतीत सांगितलं  की ज्यावेळी सालेमला बिग बॉसमधील मोनिकाच्या हालचालींची माहिती मिळाली त्यावर तो प्रचंड रागावला होता. त्यावर निकम यांनी सालेमला विचारलं होतं की तू खरोखर मोनिका सोबत लग्न केलं आहे का? त्यावर तो भडकून तुम्हाला निकाहनामा दाखवू का? मग तुमचा विश्वास बसेल असं उत्तर दिलं होतं. त्यावर निकम म्हणाले की मी बिग बॉस पाहीले आहे. त्यात मोनिकाला ही होती. त्यावर सालेम म्हणाला तुम्ही नक्की काय पाहीलं. त्यावर निकम यांनी सांगितले की ती एका मुलाच्या जास्त जवळ जात होती.  

नक्की वाचा - Ashadhi Wari News: धर्म वेगळे, माणुसकी एकच! माऊलींच्या पालखीसाठी मुस्लिम समाज सरसावला, काय केलं ते एकदा पाहा

हे ऐकून सालेम थोडा चरकला. त्याने पुन्हा विचारलं तुम्ही नक्की काय पाहीलं. त्यावर निकम यांनी तेच उत्तर दिले. ती एका तरुणाच्या जास्त जवळ जात असल्याचं पाहीलं. त्यानंतर कोर्टा आलेल्या सालेमचा निकम यांच्यासोबत संवाद झाला. निकल यांच्याशी बोलताना सालेमने सांगितलं की उद्याचा बिग बॉस नक्की बघा. दुसऱ्या दिवसी निकम यांनी बिग बॉस पाहीला. त्यात  मोनिका त्या संबंधीत तरुणापासून अंतर ठेवत असताना दिसली असं निकम यांनी सांगितलं. सालेम याने बिग बॉसच्या घरात त्यावेळी मोनिकाला एक संदेश पाठवला होता.  त्यात त्याने तिला राहुल महाजान पासून दुर राहण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं जातं. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com