
Shocking Love Story: प्रेम ही संकल्पना पवित्र आणि उदात्त मानले जाते. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करायची एखाद्या व्यक्तीची तयारी असते. पण,प्रत्येक लव्ह स्टोरीचा शेवट हा चांगला होईल असे नाही. काही लव्ह स्टोरीची शेवट हा थरकाप उडवणारा असतो. विशेषत: ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच जोडीदारी हत्या एखादी व्यक्ती करते त्यावेळी अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. छत्तीसगडची राजधानी रायपूर (Raipur) मध्ये एका प्रेम कहाणीचा शेवट 'रक्तपात' आणि 'फसवणूक'ने झाला. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकाराची गळा चिरुन हत्या केली आहे.
काय आहे प्रकरण?
मोहम्मद सद्दाम असं या मृत (Mohammad Saddam Murder) प्रियकराचं नाव आहे. या हत्याकांडामुळे पोलीसही हैराण झाले आहेत, कारण हत्येचं कारण 'प्रेम' नसून 'दबाव' होतं. लॉजच्या खोलीत सद्दाम झोपलेला असताना मुलीने त्याचा गळा चिरला. हत्येनंतर तिने खोली बाहेरून बंद केली आणि शांतपणे बिलासपूर (Bilaspur) येथे पळून गेली, पण शेवटी तिला तिच्या आईसमोर आपला गुन्हा कबूल करावा लागला.
पोलीस सूत्रांनुसार, ही घटना रायपूरच्या गंज पोलीस स्टेशन हद्दीतील एवन लॉज (Avon Lodge) मधील आहे. शनिवार रोजी अल्पवयीन मुलगी बिलासपूरहून सद्दामला भेटायला आली होती. पण ही भेट शेवटची ठरली. तपासात एक अत्यंत धक्कादायक कारण समोर आलं आहे: ती मुलगी गर्भवती होती. मोहम्मद सद्दाम तिच्याशी लग्न करण्याऐवजी, सातत्याने तिच्यावर गर्भपात (Abortion) करण्यासाठी दबाव टाकत होता. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद इतका वाढला की, मुलीने हे भयानक पाऊल उचललं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
( नक्की वाचा : Love Story: 12वीच्या विद्यार्थिनीने केले शिक्षकाशी लग्न; Video शेअर करत पोलिसांकडे केली मोठी मागणी )
ज्या चाकूने धमकावलं, त्याच चाकूने....
अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं की, 29 सप्टेंबरच्या रात्रीदेखील सद्दामने तिच्यावर गर्भपातासाठी जबरदस्ती केली आणि चाकू काढून धमकावलं. नेमक्या याच क्षणी, मुलीने काय करायचं हे ठरवलं. सद्दाम झोपताच, मुलीने तोच चाकू उचलला आणि कथितरित्या त्याचा गळा चिरला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ती मृताचा मोबाइल घेऊन पळाली आणि चावी रेल्वे ट्रॅकवर फेकून दिली.
पोलिसांना कसं कळालं?
मुलीने बिलासपूरला पोहोचल्यावर आपल्या आईला संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. आई तिला कोनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली आणि घटनेची माहिती दिली. आईच्या याच निर्णयामुळे या प्रकरणाची उकल झाली. रायपूर पोलिसांनी त्वरित लॉजवर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि अल्पवयीन मुलीला अटक केली. पोलीस आता मोहम्मद सद्दामच्या कुटुंबीयांना शोधत आहेत आणि प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत सद्दाम बिहारचा रहिवासी होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world