तुरुंगात होणाऱ्या रामलीलेत 2 कैदी झाले वानर, सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले अन् परतलेच नाही!

विजयादशमीनिमित्ताने येथील तुरुंगात रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र वानराची भूमिका साकारणारे दोन कैदी फरार झाले.

जाहिरात
Read Time: 1 min
लखनऊ:

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) हरिद्वार जिल्ह्यातील तुरुंगातून शुक्रवारी रात्री दोन कैदी रामलीला (Ramleela) नाटकाच्या प्रयोगाचा फायदा घेत फरार झाल्याचं वृत्त समोर आलंय. या घटनेनंतर तुरुंग प्रशासन आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांकडून दोन्ही कैद्याचा शोध सुरू आहे. 

रामलीलाचा फायदा घेत दोन कैदी फरार झाल्यामुळे तुरुंग प्रशासनावर सवाल उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामलीलामध्ये हे दोन्ही कैदी वानराची भूमिका साकारत होते. यादरम्यान अभिनय करीत असल्याचा आव आणून दोघेही तुरुंगातून फरार झाले. 

नक्की वाचा - भारतातील एकमेव मेबॅक कार कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात; जाणून घ्या कारची खासियत

कसे झाले फरार?
हरिद्वार जिल्ह्याच्या कारागृहात रामलीलेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील दोन कैदी वानराची भूमिका साकारत होते. सीता मातेचा शोध घेण्यासाठी दोन्ही कैदी भिंतीवरुन उडी मारून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, शिडीच्या मदतीने दोन्ही कैदी भिंत ओलांडून पळून जाण्यात यशस्वी राहिले. 

पळून गेलेल्या कैद्यांमधील एका कैद्याचं नाव पंकज असून तो एका हत्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. तर रामकुमार याच्या गुन्ह्यासंदर्भातील सुनावणी सुरू होती. घटनेबद्दल कळताच पोलिसांनी कैद्यांचा शोध सुरू केला आणि जिल्ह्याभरात नाकाबंदी लावली आहे.