परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल 21 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयित महिले विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 सप्टेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत किर्तीनगर येथे घडली आहे. या बाबत आयेशाबी इमरान टेमकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फसणूकीमुळे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न मात्र तरूणाचे भंगले आहे. शिवाय साठवलेले मेहनतीचे पैसेही हातचे निघून गेले आहेत.
आयेशाबी टेमकर या रत्नागिरीत राहातात. त्यांच्या भावाला नोकरीची गरज होती. त्याच वेळी एक महिलेने आयेशाबी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या भावाला परदेशात नोकरी मिळवून देते असं या महिलेने सांगितलं. शिवाय आपल्या नात्यातल्या मुलांनाही मी परदेशात कामाला पाठवणार असल्याचं त्या महिलेने सांगितलं. पण परदेशात नोकरीला पाठवण्यासाठी पैसे द्यावे लागतील असं त्या महिलेने सांगितलं. हे पैसे देण्याची तयारी आयेशाबी यांनी दाखवले.
नक्की वाचा - Akola News: धावत्या एसटी बसची 2 चाकं झाली वेगळी, त्यानंतर चालकाने जे काही केलं ते...
पैसे देवून भावाला नोकरी लागणार असेल तर चांगले आहे म्हणत आयेशाबी यांनी पैसे ही देवू केले. आयेशाबीने त्या महिलेला कधी रोख रक्कम तर कधी ऑनलाईन पैसे ही दिले. कधी कधी तर आयेशाबीच्या भाची व बहिण यांच्यामार्फत ही त्या महिलेने पैसे घेतले. त्याचप्रमाणे संशयित महिलेच्या सांगण्यावरुन दोन वेळा मेंगलोर व एक वेळ केरळ येथे 20 मुलांना घेवून जाण्याचा खर्च ही आयेशाबीनेच केला. ही लुट सुरूच होती. पण आयेशाबीला संशय आला नाही. त्या पैसे देत राहील्या. भावाला आज ना उद्या नोकरी मिळेल अशी आशा त्यांना होती.
संबंधीत महिलेचा पती कुवेतवरुन केरळला आल्याचा खर्च ही तिने घेतला. अशा प्रकारे एकूण 21 लाख 2 हजार 256 रुपयांची फसवणूक केली. लाखोंचा खर्च करुनही आपल्या भावाला तसेच इतर नात्यातील व ओळखीमधील कोणालाही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आयेशाबीच्या लक्षात आले. त्यानंतर आयेशाबी टेमकर यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.